हा पुरुष दरवर्षी आपल्या नगराहून सैन्यांचा देव परमेश्वर ह्याची आराधना करण्यासाठी व होमबली अर्पण करण्यासाठी शिलो येथे जात असे. एलीचे दोन पुत्र हफनी व फिनहास हे परमेश्वराचे याजक तेथे असत. एलकाना यज्ञ करी, तेव्हा तो आपली स्त्री पनिन्ना हिला व तिच्या सर्व पुत्रांना व कन्यांना वाटे देत असे. हन्नेला तो दुप्पट वाटा देई; कारण तिच्यावर त्याची प्रीती असे; परंतु परमेश्वराने तिची कूस बंद केली होती. तिची सवत तिने कुढत राहावे म्हणून तिला सारखी चिडवीत असे, कारण परमेश्वराने तिची कूस बंद केली होती. शिलोस जाण्याचा त्याचा हा परिपाठ वर्षानुवर्ष होता आणि हन्ना परमेश्वराच्या मंदिरी गेली म्हणजे पनिन्ना तिला चिडवत असे; तेव्हा ती रडे व काही खात नसे. तिचा पती एलकाना तिला एकदा म्हणाला, “हन्ना, तू का रडतेस? तू अन्नपाणी का वर्ज केलेस? तुझे हृदय खिन्न का? मी तुला दहा पुत्रांपेक्षा अधिक नाही काय?” शिलो येथे त्यांचे खाणेपिणे आटोपल्यावर हन्ना उठून गेली. तेव्हा एली परमेश्वराच्या मंदिराच्या दाराजवळ असलेल्या आपल्या आसनावर बसला होता. तिचे मन व्यथित झाल्यामुळे ती परमेश्वराची करुणा भाकून ढळढळा रडली.
१ शमुवेल 1 वाचा
ऐका १ शमुवेल 1
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: १ शमुवेल 1:3-10
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ