परमेश्वरापुढे ती अशी करुणा भाकत असता एली तिच्या मुखाकडे पाहत होता. हन्ना मनातल्या मनात बोलत होती, तिचे ओठ हालत होते; पण तिचा शब्द ऐकू येत नव्हता; म्हणून एली ह्याला वाटले की, ती द्राक्षारस प्याली असावी. एली तिला म्हणाला, “तू अशी कोठवर नशेत राहणार? तू ह्या आपल्या द्राक्षारसाच्या नशेतून मुक्त हो.” हन्ना त्याला म्हणाली, “माझे स्वामी, मी दुःखित हृदयाची स्त्री आहे; मी द्राक्षारसाचे किंवा मद्याचे सेवन केलेले नाही, मी परमेश्वरासमोर मन मोकळे करून बोलत होते. मी आपली दासी कोणी अधम स्त्री आहे असे समजू नका; मला चिंता व क्लेश मनस्वी झाल्यामुळे मी एवढा वेळ बोलत होते.” तेव्हा एली तिला म्हणाला, “तू सुखाने जा, इस्राएलाच्या देवाकडे जे मागणे तू केले आहेस ते तो तुला देवो.” ती म्हणाली, “ह्या आपल्या दासीवर आपली कृपादृष्टी होवो.” मग त्या स्त्रीने परत जाऊन अन्न सेवन केले, व त्यानंतर तिचा चेहरा उदास राहिला नाही. ती मंडळी अगदी पहाटेस उठून परमेश्वराला वंदन करून रामा येथे आपल्या घरी परत गेली; मग एलकानाने आपल्या स्त्रीला जाणले आणि परमेश्वराने तिची आठवण केली. ह्या प्रकारे हन्ना गर्भवती झाली व दिवस पुरे होऊन तिला पुत्र झाला; “हा परमेश्वराकडे मागितला” असे म्हणून तिने त्याचे नाव शमुवेल असे ठेवले. मग एलकाना परमेश्वराला आपले वार्षिक होमबली अर्पण करायला व नवस फेडायला आपल्या सगळ्या परिवारासह गेला. हन्ना तेवढी गेली नाही; ती आपल्या पतीला म्हणाली, “बालकाचे दूध तुटेपर्यंत मी थांबते. मग मी त्याला घेऊन जाईन म्हणजे तो परमेश्वरासमोर हजर होऊन तेथे निरंतर राहील.”
१ शमुवेल 1 वाचा
ऐका १ शमुवेल 1
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: १ शमुवेल 1:12-22
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ