YouVersion लोगो
सर्च आयकॉन

१ शमुवेल 1:1-6

१ शमुवेल 1:1-6 MARVBSI

एफ्राइमाच्या डोंगराळ प्रदेशातील रामाथाईम-सोफीम नामक नगराचा रहिवासी एक पुरुष होता; त्याचे नाव एलकाना बिन यरोहाम बिन एलीहू बिन तोहू बिन सूफ एफ्राइमी असे होते. त्याला दोन बायका होत्या; एकीचे नाव हन्ना व दुसरीचे नाव पनिन्ना. पनिन्नेला मुलेबाळे झाली होती, पण हन्नेला काही अपत्य नव्हते. हा पुरुष दरवर्षी आपल्या नगराहून सैन्यांचा देव परमेश्वर ह्याची आराधना करण्यासाठी व होमबली अर्पण करण्यासाठी शिलो येथे जात असे. एलीचे दोन पुत्र हफनी व फिनहास हे परमेश्वराचे याजक तेथे असत. एलकाना यज्ञ करी, तेव्हा तो आपली स्त्री पनिन्ना हिला व तिच्या सर्व पुत्रांना व कन्यांना वाटे देत असे. हन्नेला तो दुप्पट वाटा देई; कारण तिच्यावर त्याची प्रीती असे; परंतु परमेश्वराने तिची कूस बंद केली होती. तिची सवत तिने कुढत राहावे म्हणून तिला सारखी चिडवीत असे, कारण परमेश्वराने तिची कूस बंद केली होती.