YouVersion लोगो
सर्च आयकॉन

१ राजे 11:29-39

१ राजे 11:29-39 MARVBSI

त्या काळात यराबाम यरुशलेम सोडून बाहेर चालला असता त्याला वाटेत शिलोचा अहीया नामक संदेष्टा भेटला; त्याने नवे वस्त्र धारण केले होते, व त्या वेळी त्या मैदानात ते दोघेच होते. अहीयाने आपल्या अंगावरचे नवे वस्त्र काढून त्याचे बारा तुकडे केले. तो यराबामाला म्हणाला, “ह्यांतले दहा तुकडे तू घे, कारण इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याचे असे म्हणणे आहे की मी शलमोनाच्या हातून राज्य तोडून घेऊन दहा वंश तुझ्या हाती देईन; (तरी माझा सेवक दावीद ह्याच्याप्रीत्यर्थ आणि इस्राएलाच्या सर्व वंशांतून मी निवडलेल्या यरुशलेम नगराप्रीत्यर्थ त्याच्याकडे मी एक वंश राहू देईन); ह्याचे कारण हेच की ते माझा त्याग करून सीदोन्यांची देवी अष्टोरेथ, मवाबाचा देव कमोश आणि अम्मोन्यांचा देव मिलकोम ह्यांच्या भजनी लागले आहेत; ते माझ्या मार्गाने चालत नाहीत, जे माझ्या दृष्टीने योग्य ते करीत नाहीत आणि शलमोनाचा बाप दावीद माझे नियम व निर्णय पाळी तसे पाळत नाहीत. तथापि मी त्याच्या हातून सर्वच राज्य हिसकावून घेणार नाही; तर माझा सेवक दावीद माझ्या आज्ञा व नियम पाळत असे म्हणून मी त्याला निवडले होते त्याच्याप्रीत्यर्थ मी शलमोनाला त्याच्या हयातीत राजपदावर ठेवीन. पण त्याच्या पुत्राच्या हातून राज्य घेऊन तुला देईन, दहा वंशांवरले राज्य तुला देईन; आणि त्याच्या पुत्राकडे मी एक वंश राहू देईन, म्हणजे माझ्या नामाची स्थापना व्हावी म्हणून मी यरुशलेम नगर निवडले आहे त्यात माझा सेवक दावीद ह्याची ज्योती माझ्यासमोर निरंतर जळत राहील. मी तुला हाती धरीन आणि तू आपल्या मनोरथाप्रमाणे इस्राएलांवर राज्य करशील. तू माझा सेवक दावीद ह्याच्याप्रमाणे माझ्या सर्व आज्ञा मानशील, माझ्या मार्गाने चालशील, माझ्या दृष्टीने जे योग्य तेच करशील आणि माझे नियम व आज्ञा पाळत जाशील तर मी तुझ्याबरोबर राहीन आणि जसे मी दाविदाचे घराणे कायम स्थापले तसे तुझेही कायम स्थापीन आणि इस्राएल लोकांना तुझ्या हवाली करीन. शलमोनाच्या वर्तनास्तव मी दाविदाच्या संततीला दु:ख भोगायला लावीन, पण ते सर्वकाळ नाही.”