कृपादानांचे निरनिराळे प्रकार आहेत, तरी आत्मा एकच आहे; सेवा करण्याचे निरनिराळे प्रकार आहेत, तरी प्रभूएकच आहे; आणि कार्याचे निरनिराळे प्रकार आहेत, तरी सर्वांत सर्व कार्ये करणारा देव एकच आहे. तथापि आत्म्याचे प्रकटीकरण सार्वजनिक हितासाठी एकेकाला होते. कारण एखाद्याला आत्म्याच्या द्वारे ज्ञानाचे वचन मिळते; एखाद्याला त्याच आत्म्यानुसार विद्येचे वचन; एखाद्याला त्याच आत्म्यात4 विश्वास; एखाद्याला त्याच एका आत्म्यात निरोगी करण्याची कृपादाने; एखाद्याला अद्भुत कार्ये करण्याची शक्ती; एखाद्याला संदेश देण्याची शक्ती; एखाद्याला आत्मे ओळखण्याची शक्ती; एखाद्याला विशेष प्रकारच्या भाषा बोलण्याची शक्ती व एखाद्याला भाषांचा अर्थ सांगण्याची शक्ती मिळते; तरी ही सगळी कार्ये तोच एक आत्मा करतो, तो आपल्या इच्छेप्रमाणे एकेकाला ती वाटून देतो. कारण जसे शरीर एक असून त्याला अवयव पुष्कळ असतात आणि त्या शरीराचे अवयव पुष्कळ असून सर्व मिळून एक शरीर बनते, तसाच ख्रिस्त आहे. कारण आपण यहूदी असू किंवा हेल्लेणी असू, गुलाम असू किंवा स्वतंत्र असू, एक शरीर होण्यासाठी आपणा सर्वांना एका आत्म्यात बाप्तिस्मा मिळाला आहे.1 आणि आपण सर्व एकाच आत्म्याने संचरित झालो आहोत. कारण शरीर म्हणजे एक अवयव असे नव्हे, तर अनेक अवयव असे आहे. जर पाय म्हणेल, “मी हात नाही म्हणून मी शरीराचा नाही,” तर त्यावरून तो शरीराचा नाही असे होत नाही. जर कान म्हणेल, “मी डोळा नाही म्हणून मी शरीराचा नाही,” तर त्यावरून तो शरीराचा नाही असे होत नाही. सबंध शरीर डोळा असते तर ऐकण्याची क्रिया कशी झाली असती? सबंध शरीर कानच असते तर हुंगण्याची क्रिया कशी झाली असती? तर देवाने आपल्या इच्छेप्रमाणे शरीरामध्ये प्रत्येक अवयव लावून ठेवला आहे. ते सर्व मिळून एकच अवयव असते तर शरीर कोठे असते? तर मग अवयव पुष्कळ असून शरीर एक असे आहे. डोळ्याला हातास म्हणता येत नाही की, “मला तुझी गरज नाही;” तसेच मस्तकाला पायांना म्हणता येत नाही की, “मला तुमची गरज नाही.” इतकेच नव्हे तर शरीराचे जे अवयव विशेष अशक्त दिसतात तेही आवश्यक आहेत, शरीराची जी अंगे कमी योग्यतेची अशी आपण मानतो त्यांना आपण पांघरूण घालून विशेष मान देतो, आणि आपल्या कुरूप अंगास सुरूपता मिळते; आपल्या सुरूप अंगांना अशी गरज नाही. जे उणे आहे त्यांना विशेष मान मिळावा अशा रीतीने देवाने शरीर जुळवले आहे; अशासाठी की, शरीरात फूट नसावी तर अवयवांनी एकमेकांची सारखीच काळजी घ्यावी. एक अवयव दुखावला तर त्याच्याबरोबर सर्व अवयवांना सोसावे लागते; एका अवयवाचा सन्मान झाला तर त्याच्याबरोबर सर्व अवयव आनंदित होतात. तुम्ही ख्रिस्ताचे शरीर असून वैयक्तिकरीत्या त्याचे अवयव आहात. तसे देवाने मंडळीत कित्येकांना नेमले आहे; प्रथम प्रेषित, दुसरे संदेष्टे, तिसरे शिक्षक; शिवाय अद्भुत कृत्ये करणारे, निरोगी करण्याची कृपादाने मिळालेले, विचारपूस करणारे, व्यवस्था पाहणारे,2 भिन्नभिन्न भाषा बोलणारे असे नेमले आहेत. सगळेच प्रेषित आहेत काय? सगळेच संदेष्टे आहेत काय? सगळेच शिक्षक आहेत काय? सगळेच अद्भुत कृत्ये करणारे आहेत काय? निरोगी करण्याची कृपादाने सगळ्यांनाच आहेत काय? सगळेच भिन्नभिन्न भाषा बोलतात काय? भाषांचा अर्थ सगळेच सांगतात काय? श्रेष्ठ कृपादानांची उत्कंठा बाळगा. शिवाय एक सर्वोत्कृष्ट मार्ग मी तुम्हांला दाखवतो.
१ करिंथ 12 वाचा
ऐका १ करिंथ 12
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: १ करिंथ 12:4-31
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ