कृपादानांचे निरनिराळे प्रकार आहेत, तरी आत्मा एकच आहे; सेवा करण्याचे निरनिराळे प्रकार आहेत, तरी प्रभूएकच आहे; आणि कार्याचे निरनिराळे प्रकार आहेत, तरी सर्वांत सर्व कार्ये करणारा देव एकच आहे. तथापि आत्म्याचे प्रकटीकरण सार्वजनिक हितासाठी एकेकाला होते. कारण एखाद्याला आत्म्याच्या द्वारे ज्ञानाचे वचन मिळते; एखाद्याला त्याच आत्म्यानुसार विद्येचे वचन; एखाद्याला त्याच आत्म्यात4 विश्वास; एखाद्याला त्याच एका आत्म्यात निरोगी करण्याची कृपादाने; एखाद्याला अद्भुत कार्ये करण्याची शक्ती; एखाद्याला संदेश देण्याची शक्ती; एखाद्याला आत्मे ओळखण्याची शक्ती; एखाद्याला विशेष प्रकारच्या भाषा बोलण्याची शक्ती व एखाद्याला भाषांचा अर्थ सांगण्याची शक्ती मिळते; तरी ही सगळी कार्ये तोच एक आत्मा करतो, तो आपल्या इच्छेप्रमाणे एकेकाला ती वाटून देतो.
१ करिंथ 12 वाचा
ऐका १ करिंथ 12
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: १ करिंथ 12:4-11
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ