गिबोनात गिबोनाचा बाप राहत होता, त्याच्या बायकोचे नाव माका; त्याचे पुत्र : ज्येष्ठ अब्दोन, सूर, कीश, बाल, नादाब, गदोर, अह्यो व जेखर, आणि मिकलोथास शिमा झाला. हे आपल्या भाऊबंदांसमोर त्यांच्याबरोबर यरुशलेम येथे वस्ती करून होते. नेराला कीश झाला; कीशास शौल झाला. शौलास योनाथान, मलकीशुवा, अबीनादाब व एश्बाल हे होते. योनाथानाचा पुत्र मरीब्बाल; मरीब्बाल ह्याला मीखा झाला. मीखाचे पुत्र : पीथोन, मेलेख, तरेया व आहाज. आहाजास यहोअद्दा झाला; यहोआद्दास आलेमेथ, अजवामेथ व जिम्री हे झाले; जिम्रीस मोसा झाला. मोसाला बिना झाला; त्याचा पुत्र राफा, त्याचा पुत्र एलासा व त्याचा पुत्र आसेल; आसेलास सहा पुत्र होते, त्यांची नावे ही : अज्रीकाम, बोखरू, इश्माएल, शार्या, ओबद्या व हान; हे सर्व आसेलाचे पुत्र. त्याचा भाऊ एशेक ह्याचे पुत्र : ज्येष्ठ ऊलाम, दुसरा यऊष व तिसरा अलीफलेत. ऊलामाचे वंशज शूर वीर असून धनुर्धारी होते; त्यांचे पुत्रपौत्र मिळून दीडशे होते. हे सर्व बन्यामिनाच्या वंशातले होते.
१ इतिहास 8 वाचा
ऐका १ इतिहास 8
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: १ इतिहास 8:29-40
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ