YouVersion लोगो
सर्च आयकॉन

१ इतिहास 6:4-15

१ इतिहास 6:4-15 MARVBSI

एलाजारास फिनहास झाला, फिनहासास अबीशूवा झाला, अबीशूवास बुक्की झाला, बुक्कीस उज्जी झाला, उज्जीस जरह्या झाला, जरह्यास मरायोथ झाला, मरायोथास अमर्‍या झाला, अमर्‍यास अहीटूब झाला, अहीटूबास सादोक झाला, सादोकास अहीमास झाला, अहीमासास अजर्‍या झाला, अजर्‍यास योहानान झाला, योहानानास अजर्‍या झाला; शलमोनाने यरुशलेमेत जे मंदिर बांधले होते त्यात हा याजकाचे काम करीत असे. अजर्‍यास अमर्‍या झाला, अमर्‍यास अहीटूब झाला, अहीटूबास सादोक झाला, सादोकास शल्लूम झाला, शल्लूमास हिल्कीया झाला, हिल्कीयास अजर्‍या झाला, अजर्‍यास सराया झाला, सरायास यहोसादाक झाला. परमेश्वराने नबुखद्नेस्सराच्या हस्ते यहूदा व यरुशलेम ह्यांचा पाडाव केला तेव्हा यहोसादाक कैदी झाला.