YouVersion लोगो
सर्च आयकॉन

१ इतिहास 4

4
यहूदाचे वंशज
1यहूदाचे पुत्र : पेरेस, हेस्रोन, कर्मी, हूर व शोबाल.
2राया बिन शोबाल ह्याला यहथ झाला; यहथाला अहूमय व लहद हे झाले. ही सराथी कुळे होत.
3एटामाच्या बापाचे पुत्र हे : इज्रेल, हश्मा व इद्बाश; त्यांच्या बहिणीचे नाव हस्सलेलपोनी असे होते;
4आणि गदोराचा बाप पनुएल व हूशाचा बाप एजेर. बेथलेहेमाच्या बापास एफ्राथेपासून झालेला ज्येष्ठ पुत्र हूर ह्याची ही संतती.
5तकोवाचा बाप अश्हूर ह्याला हेला व नारा अशा दोन बायका होत्या.
6नारेच्या पोटी त्याला अहुज्जाम, हेफेर, तेमनी व अहष्टारी झाले. ही नारेची संतती.
7हेलेचे पुत्र : सेरथ, इसहार व एथ्नान.
8कोसाला आनूब व सोबेबा हे झाले, तसेच त्याच्यापासून हारुमाचा पुत्र अहरहेल ह्याची कुळे निपजली.
9याबेस हा आपल्या भाऊबंदांमध्ये फार प्रतिष्ठित होता; त्याच्या आईने त्याचे नाव याबेस असे ठेवून म्हटले की, “त्याला प्रसवताना मला फार क्लेश झाले.”
10याबेसाने इस्राएलाच्या देवाजवळ वर मागितला तो असा : “तू माझे खरोखर कल्याण करशील, माझ्या मुलखाचा विस्तार वाढवशील आणि माझ्यावर कोणतेही अरिष्ट येऊन मी दुःखी न व्हावे म्हणून तुझा हात माझ्यावर राहील तर किती बरे होईल!” त्याने मागितलेला हा वर देवाने त्याला दिला.
11शूहाचा भाऊ कलूब ह्याला महीर झाला; हा एष्टोनाचा बाप.
12एष्टोनास बेथ-राफा, पासेहा आणि ईर-नाहाश ह्याचा बाप तहिन्ना हे झाले. हे रेखा येथील लोक होत.
13कनाजाचे पुत्र अथनिएल व सराया; अथनिएलाचा पुत्र हथथ; आणि म्योनोथाय.
14म्योनोथायास अफ्रा झाला; सरायास यवाब झाला; हा यवाब गे-हराशीम कारागिरांचा मूळ पुरुष होय.
15यफुन्नेचा पुत्र कालेब ह्याचे पुत्र इरू, एला व नाम, एला कुळातले लोक आणि कनज हे ह्याच्यापासून झाले.
16यहल्ललेल ह्याचे पुत्र : जीफ, जीफा, तीर्‍या व असरेल.
17एज्राचे पुत्र येथेर, मेरेद. येफेर व यालोन. फारोची कन्या बिथ्या जी मेरेदाने केली होती तिची ही संतती, तिला मिर्याम, शम्माय व एष्टमोवाचा बाप इश्बह हे झाले.
18त्याच्या यहूदीण बायकोपासून त्याला गदोराचा बाप येरेद, सोखोचा बाप हेबेर व जानोहाचा बाप यकूथीएल हे झाले.
19नहमाची बहीण होदीयाची बायको झाली, तिला गार्मीकर कईला, त्याचा बाप व माकाथी एष्टमोवा हे झाले.
20शिमोनाचे पुत्र अम्नोन, रिन्ना, बेन-हानान व तिलोन आणि इशीचे पुत्र जोहेथ व बेन-जोहेथ.
21यहूदाचा पुत्र शेला ह्याच्यापासून लेखाचा बाप एर, मारेशाचा बाप लादा आणि तलम सणाचे कसबाचे काम करणार्‍या अश्बेच्या घराण्यात ही कुळे उत्पन्न झाली.
22तसेच त्याच्यापासून योकीम, कोजेबा येथील लोक, योवाश, मवाबावर सत्ता चालवणारे साराफ व याशूबी-लेहेम हे निपजले. हा प्राचीन वृत्तान्त होय.
23हे कुंभार असून नताईम व गदेरा येथे राहत असत; ते राजाचे कामकाज करून त्याच्याकडे राहत असत.
शिमोनाचे वंशज
24शिमोनाचे पुत्र : नमुवेल, यामीन, यारीब, जेरह व शौल;
25त्याचा पुत्र शल्लूम; त्याचा पुत्र मिबसाम; त्याचा पुत्र मिश्मा.
26मिश्माची संतती : त्याचा पुत्र हम्मूएल, त्याचा पुत्र जक्कूर, त्याचा पुत्र शिमी.
27शिमीस सोळा पुत्र व सहा कन्या झाल्या; पण त्याच्या भावांना फारशी संतती झाली नाही आणि त्यांचा वंश यहूदाच्या वंशाप्रमाणे वृद्धी पावला नाही.
28ते वस्ती करून राहिले ती गावे ही : बैर-शेबा, मोलादा व हसर-शुवाल,
29बिल्हा, असेम, तोलाद,
30बथुवेल, हर्मा, सिकलाग,
31बेथ-मर्काबोथ, हसर-सुसीम, बेथ-बिरी व शाराईम. दाविदाच्या कारकिर्दीपर्यंत ही त्यांची नगरे होती.
32त्यांची नावे एटाम, अईन, रिम्मोन, तोखेन आणि आशान अशी पाच नगरे;
33आणि बालापर्यंतची त्याच नगरांच्या आसपासची खेडीपाडी; त्यांची वसतिस्थाने व वंशावळ्या ह्या होत.
34मेशोबाब, यम्लेक व योशा बिन अमस्या;
35योएल, येहू बिन योशिब्या बिन सराया बिन असिएल;
36एल्योवेनाय, याकोबा, यशोहाया, असाया, अदिएल, यशीमिएल व बनाया;
37जीजा बिन शिफी बिन अल्लोन बिन यदाया बिन शिम्री बिन शमाया;
38ज्यांची नावे येथे दाखल केली आहेत ते सर्व आपापल्या कुळांचे प्रमुख होते; त्यांच्या घराण्यांची झपाट्याने वाढ झाली.
39ते आपल्या शेरडामेंढरांसाठी चारा शोधायला गदोर घाटात खोर्‍याच्या पूर्वेपर्यंत गेले.
40तेथे त्यांना कसदार व उत्तम चारा सापडला, आणि तो देश विस्तीर्ण असून शांत व निर्भय होता; तेथे पूर्वीपासून हामाचे वंशज राहत असत.
41ज्यांची नावे वर दाखल केली आहेत त्यांनी यहूदाचा राजा हिज्कीया ह्याच्या कारकिर्दीत तेथे येऊन तेथील मूनी नावाच्या लोकांचा त्यांच्या डेर्‍यांसहित अगदी संहार करून ते त्यांच्या ठिकाणी आजपर्यंत वसले आहेत; कारण त्या ठिकाणी त्यांच्या शेरडामेंढरांसाठी चारा होता.
42त्यांच्यापैकी म्हणजे शिमोनाच्या वंशजांतल्या पाचशे पुरुषांनी ईशीचे पुत्र पलट्या, निरय्या, रफाया व उज्जीएल ह्यांना आपले नायक केले आणि ते सेईर पहाडावर गेले.
43तेथे जे अमालेकी उरले होते त्यांचा संहार करून तेथे ते आजवर वस्ती करून आहेत.

सध्या निवडलेले:

१ इतिहास 4: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन