YouVersion लोगो
सर्च आयकॉन

१ इतिहास 3

3
दाविदाचे मुलगे
(२ शमु. 3:2-5; 5:13-16; १ इति. 14:3-7)
1दाविदाला हेब्रोन येथे पुत्र झाले ते हे : अहीनवाम इज्रेलकरणीपासून अम्नोन हा ज्येष्ठ पुत्र; अबीगईल कर्मेलकरीण हिच्यापासून दानीएल हा दुसरा पुत्र;
2गश्शूरचा राजा तलमय ह्याची कन्या माका हिच्यापासून अबशालोम हा तिसरा; हग्गीथेचा पुत्र अदोनीया हा चौथा;
3अबीटलेपासून शफाट्या हा पाचवा; व दाविदाची बायको एग्ला हिचा पुत्र इथ्रम हा सहावा.
4हे सहा पुत्र त्याला हेब्रोन येथे झाले; तेथे त्याने सात वर्षे सहा महिने राज्य केले. यरुशलेमेत त्याने तेहेतीस वर्षे राज्य केले.
5त्याला यरुशलेमेत पुत्र झाले ते हे : शिमा, शोबाब, नाथान व शलमोन, हे चार अम्मीएलाची कन्या बथशूवा हिला झाले;
6इभार, अलीशामा, एलीफलेट, 7नोगा, नेफेग, याफीय,
8अलीशामा, एल्यादा व एलीफलेट असे नऊ.
9हे सर्व दाविदाचे पुत्र होत; ह्यांखेरीज उपपत्नींपासून आणखी पुत्र झाले; त्यांची बहीण तामार. शलमोनाचे वंशज 10शलमोनाचा पुत्र रहबाम; त्याचा पुत्र अबीया, त्याचा पुत्र आसा, त्याचा पुत्र यहोशाफाट;
11त्याचा पुत्र योराम, त्याचा पुत्र अहज्या, त्याचा पुत्र योवाश;
12त्याचा पुत्र अमस्या, त्याचा पुत्र अजर्‍या, त्याचा पुत्र योथाम;
13त्याचा पुत्र आहाज, त्याचा पुत्र हिज्कीया, त्याचा पुत्र मनश्शे;
14त्याचा पुत्र आमोन, त्याचा पुत्र योशीया.
15योशीयाचे पुत्र : ज्येष्ठ योहानान, दुसरा यहोयाकीम, तिसरा सिद्कीया व चौथा शल्लूम.
16यहोयाकीमाचे पुत्र : त्याचा पुत्र यखन्या, त्याचा पुत्र सिद्कीया.
17बंदिवान यखन्या ह्याचा पुत्र शलतीएल;
18आणि मल्कीराम, पदाया, शेनस्सर, यकम्या, होशामा व नदब्या.
19पदायाचे पुत्र : जरूब्बाबेल व शिमी; जरूब्बाबेलचे पुत्र : मशुल्लाम व हनन्या; त्यांची बहीण शलोमीथ;
20आणि हशूबा, ओहेल, बरेख्या, हसद्या व यूशब-हेसेद हे पाच.
21हनन्याचा पुत्र : पलट्या व यशाया; रफायाचे पुत्र, अर्णानाचे पुत्र, ओबद्याचे पुत्र,
22शखन्याचा पुत्र शमाया; शमायाचे पुत्र हट्टूश, इगाल, बारीहा, निरय्या व शाफाट असे सहा.
23निरय्याचे पुत्र : एल्योवेनय, हिज्कीया व अज्रिकाम असे तीन.
24एल्योवेनय ह्याचे पुत्र : होदव्या, एल्याशीब, पलाया, अक्कूब, योहानान, दलाया व अनानी असे सात.

सध्या निवडलेले:

१ इतिहास 3: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन