१ इतिहास 2
2
इस्राएलाचे मुलगे
(उत्प. 35:22-26)
1इस्राएलाचे पुत्र हे : रऊबेन, शिमोन, लेवी, यहूदा, इस्साखार, जबुलून, 2दान, योसेफ, बन्यामीन, नफताली, गाद व आशेर. यहूदाचे वंशज 3यहूदाचे पुत्र हे : एर, ओनान व शेला; हे तिघे कनानीण बथ-शूवा हिच्या पोटी त्याला झाले. यहूदाचा ज्येष्ठ पुत्र एर हा परमेश्वराच्या दृष्टीने दुष्ट असल्यामुळे त्याला त्याने जिवे मारले.
4यहूदाची सून तामार हिच्यापासून त्याला पेरेस व जेरह हे झाले; यहूदाला एकंदर पाच पुत्र झाले.
5पेरेसाचे पुत्र : हेस्रोन व हामूल;
6जेरहाचे पुत्र : जिम्री, एथान, हेमान, कल्कोल व दारा असे एकंदर पाच.
7कर्मीचा पुत्र आखान; ह्यानेच समर्पित वस्तूसंबंधाने आगळीक करून इस्राएलास क्लेश दिला.
8एथानाचा पुत्र अजर्या.
9हेस्रोनास झालेले पुत्र यरहमेल, राम व कलुबाय हे होत.
10रामास अम्मीनादाब झाला आणि अम्मीनादाबास यहूदा वंशाचा सरदार नहशोन हा झाला;
11नहशोनाला सल्मा झाला, व सल्माला बवाज झाला;
12बवाजाला ओबेद झाला व ओबेदाला इशाय झाला;
13इशायाचा ज्येष्ठ पुत्र अलीयाब, दुसरा अबीनादाब, तिसरा शिमा,
14चवथा नथनेल, पाचवा रदाय,
15सहावा ओसेम व सातवा दावीद हे पुत्र झाले;
16व त्यांच्या बहिणी सरूवा व अबीगईल ह्या होत. सरूवेचे अबीशय, यवाब व असाएल असे तिघे पुत्र होते.
17अबीगईलीस अमासा झाला. अमासाचा बाप येथेर इश्माएली हा होता.
18कालेब बिन हेस्रोन ह्याला त्याच्या बायका अजूबा व यरियोथ ह्यांच्यापासून संतती झाली. अजूबेचे पुत्र येशेर, शोबाब व अर्दोन हे होत.
19अजूबा मेल्यावर कालेबाने एफ्राथेशी लग्न केले, तिच्या पोटी त्याला हूर झाला.
20हूरास ऊरी झाला व ऊरीस बसालेल झाला.
21नंतर हेस्रोन हा गिलादाचा बाप माखीर ह्याच्या कन्येपाशी गेला; तो साठ वर्षांचा असता त्याने तिच्याशी लग्न केले व तिच्या पोटी त्याला सगूब झाला.
22सगूबास याईर झाला; ह्याची गिलाद प्रांतात तेवीस नगरे होती.
23गशूर व अराम ह्यांनी त्यांच्यापासून हव्वोथयाईर व कनाथ आणि त्यांच्या आसपासची खेडीपाडी अशी एकंदर साठ नगरे हस्तगत केली. गिलादाचा बाप माखीर ह्याची ही संतती होय.
24हेस्रोन हा कालेब-एफ्राथ येथे मृत्यू पावल्यावर त्याची बायको अबीया हिच्या पोटी त्याला तकोवाचा बाप अश्हूर हा झाला.
25हेस्रोनाचा ज्येष्ठ पुत्र यरहमेल ह्याचे पुत्र : ज्येष्ठ पुत्र राम, बुना, ओरेम, ओसेम व अहीया हे होत.
26यरहमेलाची अटारा नावाची दुसरी एक बायको होती; ती ओनाम ह्याची आई होय.
27यरहमेलाचा ज्येष्ठ पुत्र राम ह्याचे पुत्र : मास, यामीन व एकर.
28ओनामाचे पुत्र : शम्मय व यादा; शम्मयाचे पुत्र : नादाब व अबीशूर.
29अबीशूराच्या बायकोचे नाव अबीहाईल असे होते; तिच्या पोटी त्याला अहबान व मोलीद हे झाले.
30नादाबाचे पुत्र; सलेद व अप्पईम; सलेद निपुत्रिक मेला.
31अप्पईमाचा पुत्र इशी. इशीचा पुत्र शेशान. शेशानाचा पुत्र अहलय.
32शम्मयाचा भाऊ यादा ह्याचे पुत्र : येथेर व योनाथान; येथेर हा निपुत्रिक मेला.
33योनाथानाचे पुत्र : पेलेथ व जाजा. यरहमेलाची संतती ही.
34शेशानास पुत्र नव्हते; कन्या होत्या. त्याचा यरहा नावाचा एक मिसरी चाकर होता.
35शेशानाने आपली कन्या, आपला चाकर यरहा ह्याला दिली; तिच्या पोटी त्याला अत्ताय झाला.
36अत्तायास नाथान झाला, नाथानास जाबाद झाला;
37जाबादास एफ्लाल झाला; एफलालास ओबेद झाला;
38ओबेदास येहू झाला, येहूस अजर्या झाला;
39अजर्यास हेलस झाला, हेलसाला एलासा झाला;
40एलासाला सिस्माय झाला, सिस्मायास शल्लूम झाला;
41शल्लूमास यकम्या झाला; यकम्यास अलीशामा झाला.
42यरहमेलाचा भाऊ कालेब ह्याचा ज्येष्ठ पुत्र जीफाचा बाप मेशा; हेब्रोनाचा बाप मारेशा ह्याचा वंशही त्याच्यापासूनच झाला.
43हेब्रोनाचे पुत्र : कोरह, तप्पूर, रेकेम व शमा.
44शमास रहम झाला. तो यर्कामाचा बाप; रेकेमास शम्मय झाला.
45शम्मयाचा पुत्र मावोन; मावोन बेथसूराचा बाप.
46कालेबाची उपपत्नी एफा हिला हारान, मोसा व गाजेज हे झाले; हारानास गाजेज झाला.
47यादायाचे पुत्र : रेगेम, योथाम, गेशान, पेलेट, एफा व शाफ.
48कालेबाची उपपत्नी माका हिला शेबेर व तिर्हना हे झाले.
49ह्यांशिवाय तिला मद्मानाचा बाप शाफ, आणि मखबेना व गिबा ह्यांचा बाप शवा हे झाले; कालेबाची कन्या अखसा.
50ही कालेबाची संतती होय. एफ्राथेच्या पोटचा ज्येष्ठ पुत्र होर, ह्याचा पुत्र किर्याथ-यारीमाचा बाप शोबाल हा होता.
51सल्मा हा बेथेलहेमाचा बाप; हारेफ हा बेथगादेराचा बाप.
52किर्याथ-यारीमाचा बाप शोबाल ह्याच्या वंशात हारोवे व अर्धे मनुहोथवासी हे झाले.
53किर्याथ-यारीम ह्याची कुळे : इथ्री, पूथी, शुमाथी व मिश्राई; ह्यांच्यापासून सराथी व एष्टाबुली ही निघाली.
54सल्माचे वंशज : बेथलेहेम, नटोफाथी, अटरोथ-बेथ-यवाब, आणि अर्धे मानहतवासी म्हणजे सारी;
55आणि याबेस येथे राहणारी लेखकांची कुळे म्हणजे तिराथी, शिमाथी व सुकाथी; ही रेखाब घराण्याचा मूळ पुरुष हम्मथ ह्याच्या वंशातली केनी कुळे होत.
सध्या निवडलेले:
१ इतिहास 2: MARVBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.