YouVersion लोगो
सर्च आयकॉन

१ इतिहास 25

25
गायनवादन करणार्‍यांचे गट
1दावीद व सेनापती ह्यांनी आसाफ, हेमान व यदूथून ह्यांच्या वंशजांपैकी कित्येकांना वीणा, सारंगी व झांजा वाजवून संदेश देण्याची सेवा करावी म्हणून वेगळे केले. सेवेचे हे काम करणार्‍यांची संख्या येणेप्रमाणे :
2आसाफाच्या वंशातले जक्कूर, योसेफ, नथन्या व अशेराला हे आसाफाचे पुत्र; राजाज्ञेप्रमाणे आसाफाच्या हाताखाली हे संदेश देत असत.
3यदूथूनाचे वंशज : यदूथूनाचे पुत्र गदल्या, सरी, यशाया, हशब्या व मत्तिथ्या असे सहा;1 त्यांचा बाप यदूथून वीणा वाजवून परमेश्वराचे उपकारस्मरण व स्तवन करून संदेश देत असे, ते त्याच्या हाताखाली असत.
4हेमानाचे वंशज : हेमानाचे पुत्र बुक्कीया, मत्तन्या, उज्जीएल, शबुएल, यरीमोथ, हनन्या, हनानी, अलियाथा, गिद्दल्ती, रोममती-एजेर, याश्बकाशा, मल्लोथी, होथीर व महजियोथ;
5राजाचा द्रष्टा हेमान, जो रणशिंग वाजवून परमेश्वराचे वचन सांगत असे, त्याचे हे पुत्र; देवाने हेमानाला चौदा पुत्र व तीन कन्या दिल्या.
6हे सर्व परमेश्वराच्या मंदिरात आपापल्या बापाच्या हाताखाली राहून देवाच्या मंदिराच्या सेवेत झांजा, सारंगी व वीणा वाजवून गात असत; आसाफ, यदूथून व हेमान हे राजाच्या आज्ञेत असत.
7ते व त्यांचे भाऊबंद परमेश्वराप्रीत्यर्थ गाण्याचे शिक्षण मिळून तरबेज झालेले असे दोनशे अठ्ठ्याऐंशी होते.
8त्या सर्वांनी, लहानमोठ्यांनी आणि गुरुशिष्यांनी चिठ्ठ्या टाकून आपापली कामे वाटून घेतली.
9तेव्हा पहिली चिठ्ठी आसाफाकडील योसेफ ह्याची निघाली; दुसरी गदल्याची; तो, त्याचे भाऊबंद व पुत्र मिळून बारा;
10तिसरी जक्कूराची, त्याचे पुत्र व भाऊबंद मिळून बारा;
11चौथी इस्रीची, त्याचे पुत्र व भाऊबंद मिळून बारा;
12पाचवी नथन्याची, त्याचे पुत्र व भाऊबंद मिळून बारा;
13सहावी बुक्कीयाची, त्याचे पुत्र व भाऊबंद मिळून बारा;
14सातवी यशरेलाची, त्याचे पुत्र व भाऊबंद मिळून बारा;
15आठवी यशायाची, त्याचे पुत्र व भाऊबंद मिळून बारा;
16नववी मत्तन्याची, त्याचे पुत्र व भाऊबंद मिळून बारा;
17दहावी शिमीची, त्याचे पुत्र व भाऊबंद मिळून बारा;
18अकरावी अजरेलाची, त्याचे पुत्र व भाऊबंद मिळून बारा;
19बारावी हशब्याची, त्याचे पुत्र व भाऊबंद मिळून बारा;
20तेरावी शूबाएलाची, त्याचे पुत्र व भाऊबंद मिळून बारा;
21चौदावी मतिथ्याची, त्याचे पुत्र व भाऊबंद मिळून बारा;
22पंधरावी यरेमोथाची, त्याचे पुत्र व भाऊबंद मिळून बारा;
23सोळावी हनन्याची, त्याचे पुत्र व भाऊबंद मिळून बारा;
24सतरावी याश्बाकाशाची, त्याचे पुत्र व भाऊबंद मिळून बारा;
25अठरावी हनानीची, त्याचे पुत्र व भाऊबंद मिळून बारा;
26एकोणिसावी मल्लोथीची, त्याचे पुत्र व भाऊबंद मिळून बारा;
27विसावी अलीयाथाची, त्याचे पुत्र व भाऊबंद मिळून बारा;
28एकविसावी होथीराची, त्याचे पुत्र व भाऊबंद मिळून बारा;
29बाविसावी गिद्दल्तीची, त्याचे पुत्र व भाऊबंद मिळून बारा;
30तेविसावी महजियोथाची, त्याचे पुत्र व भाऊबंद मिळून बारा;
31आणि चोविसावी रोममती-एजेराची, त्याचे पुत्र व भाऊबंद मिळून बारा; द्वारपाळ आणि देखरेख करणारे

सध्या निवडलेले:

१ इतिहास 25: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन