YouVersion लोगो
सर्च आयकॉन

१ इतिहास 24

24
1अहरोन वंशजांचे वर्ग हे : अहरोनाचे पुत्र नादाब, अबीहू, एलाजार व इथामार.
2नादाब व अबीहू हे आपल्या बापापूर्वी निपुत्रिक मेले म्हणून एलाजार व इथामार हे याजकांचे काम करीत.
3दाविदाने एलाजाराच्या वंशांतला सादोक व इथामाराच्या वंशातला अहीमलेख ह्यांना त्यांची सेवेची कामे वाटून दिली.
4इथामाराच्या वंशजांपेक्षा एलाजाराच्या वंशजांत प्रमुख पुरुष अधिक निपजले; त्यांची वाटणी येणेप्रमाणे झाली : एलाजाराच्या वंशातील पितृकुळांचे प्रमुख सोळा होते, आणि इथामाराच्या वंशातील पितृकुळांप्रमाणे आठ होते.
5ह्याप्रमाणे दोन्ही घराण्यांतले पुरुष घेऊन त्यांची चिठ्ठ्या टाकून वाटणी केली; कारण पवित्रस्थानाचा अधिकार व देवाकडची सरदारी एलाजार व इथामार ह्या दोन्ही वंशांतल्या पुरुषांकडे होती.
6आणि लेव्यांपैकी नथनेल लेखक ह्याचा पुत्र शमाया ह्याने राजा व अधिकारी, सादोक याजक व अब्याथाराचा पुत्र अहीमलेख आणि लेवी व याजक ह्यांच्या पितृकुळांचे प्रमुख ह्यांच्यासमोर त्यांची नावे लिहिली; एक प्रमुख घराणे एलाजाराचे व एक इथामाराचे अशी धरली.
7पहिली चिठ्ठी यहोयारीबाची निघाली, दुसरी यदायाची,
8तिसरी हारीमाची, चौथी सोरीमाची, 9पाचवी मलकीयाची, सहावी मीयामिनाची,
10सातवी हक्कोसाची, आठवी अबीयाची,
11नववी येशूबाची, दहावी शकन्याची,
12अकरावी एल्याशिबाची, बारावी याकीमाची,
13तेरावी हुप्पाची, चौदावी येशेबाबाची,
14पंधरावी बिल्गाची, सोळावी इम्मेराची,
15सतरावी हेजीराची, अठरावी हप्पिसेसाची,
16एकोणिसावी पथह्याची, विसावी यहेजकेलाची,
17एकविसावी याखीनाची, बाविसावी गामूलाची,
18तेविसावी दलायाची आणि चोविसावी माज्याची.
19इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याने आज्ञा केली होती त्यानुसार त्यांचा पूर्वज अहरोन ह्याच्या हस्ते त्यांना लावून दिलेल्या विधीप्रमाणे परमेश्वराच्या मंदिरात सेवा करण्यासाठी पाळीपाळीने जावे म्हणून हा जाण्याचा क्रम त्यांना लावून दिला होता.
20लेवीचे वरकड वंशज : अम्रामाच्या वंशातला शूबाएल, शूबाएलाच्या पुत्रातला येहदाया.
21रहब्याचे वंशज : रहब्याच्या वंशात मुख्य इशिया.
22इसहारीयांतला शलोमोथ, शलोमोथाच्या पुत्रांतला यहथ;
23हेब्रोनाचे पुत्र : पहिला यरीया, दुसरा अमर्‍या, तिसरा यहजियेल, चवथा यकमाम.
24उज्जीएलाच्या वंशातला मीखा, मीखाच्या पुत्रांतला शामीर.
25मीखाचा भाऊ इश्शिया, इश्शियाच्या वंशातला जखर्‍या;
26मरारीचे पुत्र : महली व मूशी; याजीयाचा वंशज बनो.
27मरारीच्या वंशातले याजीयाचे पुत्र : बनो, शोहम, जक्कूर व इब्री.
28महलीचा एलाजार, ह्याला पुत्र झाला नाही.
29कीशाचे वंशज : कीशाचा वंशज यरहमेल.
30मूशीचे पुत्र : महली, एदर व यरीमोथ; हे लेव्यांचे वंशज आपापल्या पितृकुळांप्रमाणे होते.
31ह्यांनीही आपले बांधव अहरोनवंशज ह्यांच्याप्रमाणे दावीद राजा, सादोक, अहीमलेख आणि याजकांच्या व लेव्यांच्या पितृकुळाचे प्रमुख पुरुष ह्यांच्यासमोर चिठ्ठ्या टाकल्या; मुख्य पुरुषाचे पितृकुळ त्याच्या कनिष्ठ बांधवांच्या पितृकुळाबरोबर गणले.

सध्या निवडलेले:

१ इतिहास 24: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन