YouVersion लोगो
सर्च आयकॉन

१ इतिहास 11:4-9

१ इतिहास 11:4-9 MARVBSI

नंतर दावीद व सर्व इस्राएल लोक यरुशलेमेस गेले (ह्यालाच यबूस असे म्हणतात); त्या देशाचे रहिवासी यबूसी लोक तेथे राहत असत. यबूस येथल्या रहिवाशांनी दाविदाला सांगितले की, “तू येथे येऊ नकोस.” तथापि दाविदाने सीयोन नावाचा गड सर केला; त्यालाच दावीदपूर म्हणतात. दावीद म्हणाला, “जो कोणी सर्वांच्या आधी यबूसी लोकांना मार देईल तो मुख्य सेनापती होईल.” सरूवेचा पुत्र यवाब हा प्रथम चढाई करून गेला म्हणून त्याला सेनापती केले. दावीद त्या गडात राहू लागला म्हणून त्याचे नाव दावीदपूर पडले. त्याने नगराला चोहोकडून म्हणजे मिल्लोपासून सभोवार कोट बांधला आणि यवाबाने बाकीच्या नगराचा जीर्णोद्धार केला. दावीद अधिकाधिक थोर होत गेला, कारण सेनाधीश परमेश्वर त्याच्याबरोबर असे.