इस्राएलाविषयी परमेश्वर बोलला होता त्यानुसार दाविदाच्या ज्या शूर वीरांनी त्याच्या पक्षाचे होऊन त्याला गादी मिळवून देण्यात साहाय्य केले ते प्रमुख पुरुष हे होत. दाविदाकडे असलेल्या शूर वीरांची नावे ही : हखमोन्याचा पुत्र याशबाम हा तिसांचा1 नायक असून त्याने तीनशे लोकांवर भाला चालवून त्यांना एका प्रसंगी मारून टाकले. त्याच्या खालोखाल अहोही दोदय ह्याचा पुत्र एलाजार हा होता; तो तिघा महावीरांपैकी एक होता. तो पस-दम्मीम2 येथे दाविदाबरोबर होता; तेथे पलिष्ट्यांनी एकत्र होऊन जवाच्या एका शेतात सैन्यव्यूह रचला तेव्हा लोक पलिष्ट्यांसमोरून पळून गेले. त्यांनी त्या शेतामध्ये उभे राहून त्याचे रक्षण करून पलिष्ट्यांचा संहार केला; त्या प्रसंगी परमेश्वराने त्यांना मोठा विजय प्राप्त करून देऊन त्यांचा बचाव केला. मग त्या तीस नायकांतले तिघे अग्रणी दाविदाकडे अदुल्लाम गुहेत गेले; तेव्हा पलिष्ट्यांचे सैन्य रेफाईम खोर्यात छावणी देऊन होते. त्या प्रसंगी दावीद गडावर असून बेथलेहेमात पलिष्ट्यांचे ठाणे बसले होते. दाविदाला उत्कट इच्छा होऊन तो म्हणाला, “बेथलेहेमाच्या वेशीजवळील विहिरीचे पाणी मला कोणी पाजील तर किती बरे!” त्या तिघांनी पलिष्ट्यांच्या छावणीत घुसून बेथलेहेमाच्या वेशीजवळील विहिरीचे पाणी काढून दाविदाकडे आणले; पण तो ते पिईना. त्याने ते परमेश्वराच्या नामाने ओतले. तो म्हणाला, “हे माझ्या देवा, असे कृत्य माझ्याकडून न घडो; जे आपल्या प्राणांवर उदार झाले त्यांचे हे रक्त मी प्यावे काय? कारण त्यांनी आपला जीव धोक्यात घालून हे आणले आहे.” म्हणून तो ते पिईना. त्या तिघा वीरांनी हे कृत्य केले.
१ इतिहास 11 वाचा
ऐका १ इतिहास 11
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: १ इतिहास 11:10-19
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ