1
स्तोत्रसंहिता 91:2
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
मी याहवेहला म्हणेन, “तेच माझा आश्रय व माझा दुर्ग आहेत, माझे परमेश्वर, ज्यांच्यावर मी भरवसा ठेवला आहे.”
तुलना करा
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 91:2
2
स्तोत्रसंहिता 91:1
जो परमोच्चाच्या आश्रयाखाली राहतो, तो सर्वसमर्थाच्या सावलीत राहील.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 91:1
3
स्तोत्रसंहिता 91:15
तो माझा धावा करेल, तेव्हा मी त्याला उत्तर देईन; त्याच्या संकटकाळी मी त्याच्याबरोबर असेन; मी त्याला सोडवेन आणि त्याचा सन्मान करेन.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 91:15
4
स्तोत्रसंहिता 91:11
कारण ते आपल्या स्वर्गदूतांना तुझ्यासंबंधाने आज्ञा देतील, म्हणजे तू जाशील तिथे तुझे रक्षण व्हावे.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 91:11
5
स्तोत्रसंहिता 91:4
ते आपल्या परांनी तुझ्यावर पाखर घालतील, त्यांच्या पंखाखाली तुला आश्रय मिळेल; त्यांचे सत्य तुझी ढाल व गड होईल.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 91:4
6
स्तोत्रसंहिता 91:9-10
जर तू म्हणाला, “याहवेह माझे आश्रयस्थान आहेत,” आणि तू परमोच्चास आपले निवासस्थान केलेस, तर तुला कोणतीही इजा होणार नाही, किंवा कोणतेही अरिष्ट तुझ्या तंबूजवळ येणार नाही.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 91:9-10
7
स्तोत्रसंहिता 91:3
कारण ते पारध्याच्या पाशापासून आणि प्राणघातक मरीपासून तुझे रक्षण करतील.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 91:3
8
स्तोत्रसंहिता 91:7
हजार लोक तुझ्याजवळ पडले, आणि दहा हजार तुझ्या उजव्या बाजूला पडले, तरी ती संकटे तुझ्या जवळदेखील येणार नाहीत.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 91:7
9
स्तोत्रसंहिता 91:5-6
तुला अंधकाराच्या आतंकाचे भय वाटणार नाही, किंवा दिवसा सुटणार्या बाणांचेही नाही. अंधारात दबा धरून राहणार्या मरीचे, किंवा भर दुपारी येणार्या आपत्तीचेही भय वाटणार नाही.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 91:5-6
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ