1
स्तोत्रसंहिता 37:4
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
याहवेहमध्ये आनंद कर, म्हणजे ते तुझ्या हृदयाची मागणी पूर्ण करतील.
तुलना करा
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 37:4
2
स्तोत्रसंहिता 37:5
तू आपला जीवनक्रम याहवेहच्या स्वाधीन कर; त्यांच्यावर भरवसा ठेव, म्हणजे ते तुझ्यासाठी हे करतील
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 37:5
3
स्तोत्रसंहिता 37:7
याहवेहसमोर निश्चिंत राहा व धीराने त्यांची वाट पाहा; जेव्हा लोकांना त्यांच्या मार्गात यश मिळते, त्यांच्या दुष्ट योजना सफल होतात, तेव्हा तू संतापू नकोस.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 37:7
4
स्तोत्रसंहिता 37:3
याहवेहवर भरवसा ठेव आणि चांगले ते कर; की तू सुरक्षित कुरणाचा आनंद उपभोगून देशात वसती करू शकशील.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 37:3
5
स्तोत्रसंहिता 37:23-24
ज्याला याहवेह प्रिय वाटतात, त्या मनुष्याची पावले याहवेह स्थिर करतात; जरी तो अडखळला, तरी तो खाली पडणार नाही, कारण याहवेह त्याला आपल्या हाताने सावरतील.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 37:23-24
6
स्तोत्रसंहिता 37:6
तुझ्या नीतिमत्त्वाचे फळ सूर्योदयेप्रमाणे प्रकाशित होईल, तुझ्यातील सत्यता भर दुपारच्या सूर्यप्रकाशाप्रमाणे स्पष्ट होईल.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 37:6
7
स्तोत्रसंहिता 37:8
तुझा राग सोडून दे आणि चिरडीस येऊ नको; हेवा करू नको—नाहीतर वाईट करण्यास तू प्रवृत्त होशील.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 37:8
8
स्तोत्रसंहिता 37:25
मी तरुण होतो आणि आता प्रौढ झालो आहे, तरी आजपर्यंत नीतिमानाला टाकलेला किंवा त्याच्या संततीला भीक मागताना मी पाहिले नाही.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 37:25
9
स्तोत्रसंहिता 37:1
दुष्टांचा हेवा करू नकोस; दुष्कर्म करणार्यांमुळे अस्वस्थ होऊ नकोस.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 37:1
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ