1
नीतिसूत्रे 3:5-6
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
तुझ्या संपूर्ण अंतःकरणापासून याहवेहवर भरवसा ठेव; आणि स्वतःच्या बुद्धीवर अवलंबून राहू नकोस; तुझ्या सर्व मार्गात तू त्यांच्या अधीन राहा, आणि ते तुझे मार्ग सुकर करतील.
तुलना करा
एक्सप्लोर करा नीतिसूत्रे 3:5-6
2
नीतिसूत्रे 3:7
स्वतःच्या नजरेत शहाणा होऊ नकोस; परंतु याहवेहचे भय बाळग आणि वाईटापासून दूर राहा.
एक्सप्लोर करा नीतिसूत्रे 3:7
3
नीतिसूत्रे 3:9-10
तुझ्या संपत्तीने व तुझ्या सर्व पिकातील प्रथमफळांनी याहवेहचा सन्मान कर; तेव्हा तुझी कोठारे समृद्धीने भरून जातील, आणि तुझी कुंडे नव्या द्राक्षारसाने ओसंडून वाहतील.
एक्सप्लोर करा नीतिसूत्रे 3:9-10
4
नीतिसूत्रे 3:3
प्रीती आणि विश्वासूपणा तुला कधीही न त्यागोत; त्यांना तू आपल्या गळ्याभोवती बांध, त्यांना तुझ्या हृदयाच्या पटलावर लिहून ठेव.
एक्सप्लोर करा नीतिसूत्रे 3:3
5
नीतिसूत्रे 3:11-12
माझ्या पुत्रा, याहवेहच्या शिस्तीचा अनादर करू नकोस; आणि त्यांनी निषेध केल्यास चिडू नकोस; कारण जसा पिता मुलामध्ये आनंद मानतो, तसाच त्याला शिस्तही लावतो, याहवेह ज्यांच्यावर प्रीती करतात त्यालाच ते शिस्त लावतात!
एक्सप्लोर करा नीतिसूत्रे 3:11-12
6
नीतिसूत्रे 3:1-2
माझ्या मुला, माझे शिक्षण विसरू नकोस, परंतु माझ्या आज्ञा तुझ्या अंतःकरणात ठेव; कारण ते तुझे आयुष्य अनेक वर्षापर्यंत वाढवतील, आणि तुला शांती आणि समृद्धी देतील.
एक्सप्लोर करा नीतिसूत्रे 3:1-2
7
नीतिसूत्रे 3:13-15
ज्या मानवांना सुज्ञान प्राप्त होते व जे समंजसपणा मिळवितात ते धन्य. कारण ती चांदीपेक्षा फारच लाभदायक आहे, आणि ती सोन्यापेक्षा अधिक फायदा मिळवून देते. ती माणकांपेक्षा अधिक मोलवान आहे, तुला आवडणार्या कोणत्याही वस्तूंची तुलना तू तिच्याबरोबर करू शकत नाही.
एक्सप्लोर करा नीतिसूत्रे 3:13-15
8
नीतिसूत्रे 3:27
ज्यांचे भले करण्याचे तुझ्या आटोक्यात असले, तर ते करण्यास नाकारू नकोस.
एक्सप्लोर करा नीतिसूत्रे 3:27
9
नीतिसूत्रे 3:19
सुज्ञानाद्वारे याहवेह यांनी पृथ्वीचा पाया घातला, शहाणपणाने त्यांनी आकाशाची स्थापना केली
एक्सप्लोर करा नीतिसूत्रे 3:19
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ