1
नीतिसूत्रे 11:25
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
उदार मनुष्याची समृद्ध होईल; आणि जो दुसर्याला प्रोत्साहित करतो, तो स्वतः प्रोत्साहित होईल.
तुलना करा
एक्सप्लोर करा नीतिसूत्रे 11:25
2
नीतिसूत्रे 11:24
एक मनुष्य सढळ हाताने देतो, तरी देखील तो समृद्ध होतो, दुसरा मनुष्य दान देणे उगाच नाकारतो आणि तो दरिद्री बनतो.
एक्सप्लोर करा नीतिसूत्रे 11:24
3
नीतिसूत्रे 11:2
जेव्हा गर्विष्ठपणा येतो, तेव्हा अप्रतिष्ठा येते, परंतु विनम्रपणामुळे सुज्ञता प्राप्त होते.
एक्सप्लोर करा नीतिसूत्रे 11:2
4
नीतिसूत्रे 11:14
मार्गदर्शन नसल्यामुळे राष्ट्राचे पतन होते, परंतु अनेक सल्लागार असल्याने विजय प्राप्त होतो.
एक्सप्लोर करा नीतिसूत्रे 11:14
5
नीतिसूत्रे 11:30
नीतिमानाचे फळ जीवनाचा वृक्ष होय, आणि जो सुज्ञ आहे तो आत्मे जिंकतो.
एक्सप्लोर करा नीतिसूत्रे 11:30
6
नीतिसूत्रे 11:13
चहाडी करण्याने विश्वासघात होतो, परंतु विश्वासपात्र मनुष्य गुपित उघड करीत नाही.
एक्सप्लोर करा नीतिसूत्रे 11:13
7
नीतिसूत्रे 11:17
दयाळू मनुष्य स्वतःचे भले करतो, परंतु क्रूर माणसे स्वतःवर नाश ओढवून घेतात.
एक्सप्लोर करा नीतिसूत्रे 11:17
8
नीतिसूत्रे 11:28
जे आपल्या संपत्तीवर भरवसा ठेवतात, तो नाश पावतील, परंतु नीतिमान मनुष्य हिरव्या पानाप्रमाणे बहरेल.
एक्सप्लोर करा नीतिसूत्रे 11:28
9
नीतिसूत्रे 11:4
प्रकोपाच्या दिवशी संपत्ती निरुपयोगी असते, परंतु नीतिमत्व मृत्यूपासून सोडविते.
एक्सप्लोर करा नीतिसूत्रे 11:4
10
नीतिसूत्रे 11:3
नीतिमानाचा प्रामाणिकपणा त्यांचे मार्गदर्शन करतो, परंतु दुटप्पीपणा विश्वासघातकी लोकांचा नाश करतो.
एक्सप्लोर करा नीतिसूत्रे 11:3
11
नीतिसूत्रे 11:22
विवेकहीन सुंदर स्त्री जणू डुकराच्या नाकातील सोन्याची नथच समजावी.
एक्सप्लोर करा नीतिसूत्रे 11:22
12
नीतिसूत्रे 11:1
खोट्या तराजूंचा याहवेह तिरस्कार करतात, परंतु अचूक वजनांमुळे त्यांना संतोष होतो.
एक्सप्लोर करा नीतिसूत्रे 11:1
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ