रात्रीच्या स्वप्नात, दृष्टान्तामध्ये,
जेव्हा लोकांना गाढ झोप लागलेली असते
त्यांच्या बिछान्यावर डुलक्या घेत असताना,
परमेश्वर त्यांच्या कानात बोलून
आणि चेतावणी देऊन त्यांना घाबरवितात,
म्हणजे ते मनुष्याच्या चुकीच्या वर्तनापासून फिरतील
आणि अहंकारापासून दूर राहतील,
खड्ड्यात पडण्यापासून
आणि तलवारीने त्यांचे जीवन नष्ट होण्यापासून त्यांना राखतील.