परंतु परमेश्वर बलवानाला आपल्या सामर्थ्याने राखतात;
त्याला जीवनाची खात्री नसली तरी ते स्थिरावतात.
आम्ही सुरक्षित आहोत असे त्यांना वाटू दिले,
तरी परमेश्वराची नजर त्यांच्या मार्गावर असते.
त्यांची बढती केवळ क्षणभंगुर आहे आणि ते लवकरच नष्ट होतात;
इतरांप्रमाणे ते देखील गळून पडतात;
धान्याच्या कणसाप्रमाणे ते कापले जातील.