याहवेहने असे म्हणतात:
“शहाण्याने स्वतःच्या शहाणपणाचा अभिमान बाळगू नये.
बलाढ्य मनुष्याने बलाचा तोरा मिरवू नये
आणि श्रीमंताने श्रीमंतीचा गर्व करू नये.
जो प्रौढी मिरवतो त्याने याविषयी प्रौढी मिरवावी
मी याहवेह, जो कृपा करणारा
पृथ्वीवर न्याय आणि नीती करणारा आहे,
असे त्यांनी मला खरोखर समजावे,
ह्यात मला संतोष आहे,
असे याहवेहने म्हणतात.”