तू म्हणालास, ‘मला धिक्कार असो! माझ्या क्लेशात याहवेहने दुःखाची भर घातली आहे; मी उसासे टाकून थकून गेलो आहे आणि मला काही विश्रांती मिळत नाही.’ परंतु याहवेहने मला तुला हे सांगण्यास म्हटले, ‘याहवेह असे म्हणतात: जे मी बांधलेले आहे ते मी नष्ट करेन, संपूर्ण पृथ्वीवर मी जे पेरले, ते मीच उपटून टाकेन.