केवळ तुम्ही आपली पापे स्वीकार करा—
तुमचे याहवेह परमेश्वर यांच्याविरुद्ध तुम्ही बंड केले आहे,
इतर परकीय दैवतांची तुम्ही उपासना केली
प्रत्येक विस्तृत वृक्षाखाली,
माझे आज्ञापालन केले नाही,’ ”
असे याहवेह म्हणतात.
“विश्वासहीन लोकांनो, परत या,” याहवेह म्हणतात, “कारण मी तुमचा धनी आहे. मी तुमची निवड करेन—एका नगरातून एक आणि एका कुळातून दोन—आणि तुला सीयोनास आणेन.