त्यांना सांग मी इस्राएलचा परमेश्वर याहवेह असे म्हणतो: या कराराच्या अटींचे पालन न करणारा मनुष्य शापित आहे— ‘इजिप्तच्या गुलामगिरीतून, लोखंडी भट्टीतून मी त्यांना सोडवून बाहेर आणले तेव्हा मी त्यांना हे नियम सांगितले होते.’ मी म्हटले ‘माझ्या आज्ञा व मी जे सुचविले ते पालन करा, आणि मग तुम्ही माझे लोक व्हाल आणि मी तुमचा परमेश्वर होईन.