1
यशायाह 51:12
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
“मी, तो मीच आहे, जो तुमचे सांत्वन करेल. तुम्ही कोण आहात जे मर्त्य मानवांना भिता, मानवप्राणी, जे केवळ गवताप्रमाणे असतात
तुलना करा
एक्सप्लोर करा यशायाह 51:12
2
यशायाह 51:16
मी माझी वचने तुमच्या मुखात घातली आहेत आणि तुम्हाला माझ्या हाताच्या सावलीत झाकून ठेवले आहे— मीच आहे, ज्याने आकाशाला स्थिर असे ठेवले, आणि सर्व पृथ्वीसाठी पाया घातला, आणि जो सीयोनला म्हणतो, ‘तुम्ही माझे आहात.’ ”
एक्सप्लोर करा यशायाह 51:16
3
यशायाह 51:7
“हे, नीतिमत्ता जाणणार्या लोकांनो, माझ्या नियमांवर अंतःकरणापासून भाव ठेवणार्यांनो माझे ऐका: मर्त्य मानवाच्या उपहासाने भयभीत होऊ नका किंवा त्यांनी केलेल्या निंदेला घाबरू नका.
एक्सप्लोर करा यशायाह 51:7
4
यशायाह 51:3
तर याहवेह सीयोनचे निश्चितच सांत्वन करतील आणि तिच्या सर्व ओसाड प्रदेशाकडे दयेने बघतील; ते तिचे वाळवंट एदेन बागेसारखे सुंदर करतील, तिची उजाड ठिकाणे याहवेहच्या बागेसारखी होतील. तिथे आनंद व उल्लास व्यक्त करण्यात येईल. उपकारस्मरण व गीतांचे स्वर तिथे ऐकू येतील.
एक्सप्लोर करा यशायाह 51:3
5
यशायाह 51:11
ज्यांना याहवेहने सोडविले, ते लोक परत येतील. ते हर्षगीते गात सीयोनात प्रवेश करतील; अनंतकाळचा उल्हास त्यांच्या मस्तकावर असेल. हर्ष व उल्हासाने ते भरून जातील, दुःख व शोक दूर पळून जातील.
एक्सप्लोर करा यशायाह 51:11
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ