याहवेह असे म्हणतात—
ज्यांनी समुद्रातून मार्ग काढला,
महासागरामधून रस्ता तयार केला,
ज्यांनी इजिप्तच्या सैन्याला व त्याच्या रथांसह व घोड्यांसह
व त्यांच्या मजबूतीच्या ज्यादा कुमकीसह बुडविले,
तेव्हा तेवत्या वाती मालवाव्या तशा, त्यांच्या प्राणज्योती अशा मालविल्या,
कि ते परत कधीही न उठण्यासाठी तिथेच गारद झाले