जर तुम्हामध्ये कोणी ज्योतिषी किंवा स्वप्नांच्या आधाराने भविष्य सांगणारा असेल व त्याने दैवी चिन्ह आणि चमत्कारांची घोषणा केली, आणि जर त्याची चिन्हे आणि भविष्ये खरी ठरली आणि तो ज्योतिषी म्हणेल, “चला, आपण इतर दैवतांचे अनुसरण करू आणि त्यांची उपासना करू.” (अशी दैवते ज्यांची तुम्हाला ओळख नसेल) तर तुम्ही त्या ज्योतिष्याचे किंवा स्वप्नदर्शीचे शब्द ऐकू नका. कारण तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वरावर मनापासून प्रीती करता की नाही, हे पाहण्यासाठी परमेश्वर तुमची परीक्षा घेत आहेत.