इस्राएलचे परमेश्वर बोलले,
इस्राएलच्या खडकाने मला म्हटले:
‘जेव्हा एखादा मनुष्य न्यायाने लोकांवर राज्य करतो,
जेव्हा तो परमेश्वराचे भय बाळगून राज्य करतो,
तो सूर्योदयाच्या प्रकाशासारखा
निरभ्र पहाटेच्या प्रभेसारखा,
पाऊसानंतरच्या तेजाप्रमाणे
जे भूमीतून गवत उगवते त्याप्रमाणे आहे.’