यावेळी अचानक अबशालोमची दावीदाच्या माणसांशी गाठ पडली. तो त्याच्या खेचरावर बसून जात असता, खेचर एका मोठ्या एला झाडाच्या दाट फांद्यांखालून गेले आणि अबशालोमचे केस त्यात अडकले. तो हवेत लटकत राहिला आणि त्याचे खेचर ज्यावर तो बसला होता ते पुढे चालत राहिले.
जेव्हा दावीदाच्या एका मनुष्याने जे झाले ते पाहिले व त्याने ते योआबाला सांगितले, “अबशालोमला एलाच्या झाडाला लटकत असलेले मी पाहिले.”