1
2 राजे 5:1
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
नामान हा अरामाच्या राजाच्या सैन्याचा सेनापती होता. तो त्याच्या स्वामीच्या नजरेत एक थोर आणि अत्यंत आदरणीय होता, कारण याहवेहने त्याच्याद्वारे अरामाला विजय मिळवून दिला होता. तो एक पराक्रमी वीरपुरुष होता; परंतु त्याला कुष्ठरोग झाला होता.
तुलना करा
एक्सप्लोर करा 2 राजे 5:1
2
2 राजे 5:10
अलीशाने एका निरोप्याद्वारे त्याला संदेश पाठविला, “जा यार्देन नदीत जाऊन सात वेळा स्वतःला धुवून घे म्हणजे तुझे शरीर पूर्वीसारखे शुद्ध होईल.”
एक्सप्लोर करा 2 राजे 5:10
3
2 राजे 5:14
मग तो खाली गेला आणि परमेश्वराच्या मनुष्याने सांगितल्याप्रमाणे यार्देन नदीमध्ये सात वेळा बुड्या मारल्या आणि त्याचे शरीर पूर्ववत् होऊन लहान मुलाच्या शरीरासारखे शुद्ध झाले.
एक्सप्लोर करा 2 राजे 5:14
4
2 राजे 5:11
परंतु नामान रागात निघाला आणि म्हणाला, “पाहा, मला वाटले की ते खात्रीने बाहेर माझ्याकडे येतील आणि उभे राहतील आणि याहवेह त्यांच्या परमेश्वराच्या नावाचा धावा करतील, आपला हात माझ्या आजारी देहावर फिरवतील आणि माझे कोड बरे करतील.
एक्सप्लोर करा 2 राजे 5:11
5
2 राजे 5:13
नामानाचे सेवक त्याच्याकडे गेले आणि म्हणाले, “माझ्या पित्या, संदेष्ट्याने आपल्याला एखादी अवघड गोष्ट करावयास सांगितली असती, तर ती तुम्ही केली नसती काय? त्यांनी तर आपल्याला एवढेच सांगितले, जा स्नान कर आणि शुद्ध हो. तर मग तसे करावे की नाही?”
एक्सप्लोर करा 2 राजे 5:13
6
2 राजे 5:3
एके दिवशी ती मुलगी आपल्या धनिणीला म्हणाली, “आपल्या स्वामींनी शोमरोनातील संदेष्ट्याची भेट घेतली असती तर किती बरे झाले असते! तो त्यांचा कुष्ठरोग बरा करू शकला असता.”
एक्सप्लोर करा 2 राजे 5:3
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ