त्याच्या संकटात त्याने त्याचे परमेश्वर याहवेह यांची कृपा मिळविण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्या पूर्वजांच्या परमेश्वरासमोर स्वतःला अधिक नम्र केले. आणि जेव्हा त्याने त्यांच्याकडे प्रार्थना केली, तेव्हा याहवेहना त्याच्या कळकळीच्या विनंतीमुळे दया आली आणि त्यांनी त्याची विनंती ऐकली; म्हणून त्यांनी त्याला यरुशलेम आणि त्याच्या राज्यात परत आणले. तेव्हा मनश्शेहला उमजले की, याहवेह हेच परमेश्वर आहेत.