तो आसाला भेटण्यासाठी गेला आणि त्याला म्हणाला, “आसा आणि सर्व यहूदाह व बिन्यामीन माझे ऐका, याहवेह तुमच्याबरोबर आहेत, जेव्हा तुम्ही त्यांच्याबरोबर राहाल. जर तुम्ही त्यांचा शोध घ्याल, तर ते तुम्हाला सापडतील, परंतु जर तुम्ही त्यांना सोडाल, तर ते तुम्हाला सोडतील.