तुम्ही पुत्र आहात, हे दर्शविण्यासाठी देवाने ‘पित्या, माझ्या पित्या’ अशी हाक मारणाऱ्या आपल्या पुत्राच्या आत्म्याला तुमच्या आमच्या अंतःकरणात पाठविले आहे. ह्यावरून तू आत्तापासून गुलाम नाहीस, तर पुत्र आहेस आणि म्हणूनच देवाने आपल्या लेकरांकरिता जे राखून ठेवले आहे, ते सर्व तो तुला देईल.