1
2 करिं. 4:18
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
आता आम्ही दिसणार्या गोष्टींकडे पाहत नाही पण न दिसणार्या गोष्टींकडे पाहतो कारण दिसणार्या गोष्टी क्षणिक आहेत पण न दिसणार्या गोष्टी सार्वकालिक आहेत.
तुलना करा
एक्सप्लोर करा 2 करिं. 4:18
2
2 करिं. 4:16-17
म्हणून आम्ही खचत नाही. पण जरी आमचे हे बाहेरील देहपण नाश पावत आहे, तरी आमचे अंतर्याम हे दिवसानुदिवस नवीन होत आहे. कारण हे जे हलके दुःख केवळ तात्कालिक आहे ते आमच्यासाठी फार अधिक मोठ्या अशा सार्वकालिक गौरवाचा भार तयार करते.
एक्सप्लोर करा 2 करिं. 4:16-17
3
2 करिं. 4:8-9
आम्हावर चारी दिशांनी संकटे येतात पण आम्ही अजून चिरडले गेलो नाही, आम्ही गोधळलेलो आहोत पण निराश झालो नाही. आमचा पाठलाग केला गेला, पण त्याग केला गेला नाही, आम्ही खाली पडलेले आहोत तरी आमचा नाश झाला नाही.
एक्सप्लोर करा 2 करिं. 4:8-9
4
2 करिं. 4:7
पण आमचे हे धन आमच्याजवळ मातीच्या भांड्यात आहे, याचा अर्थ हा की, सामर्थ्याची पराकाष्ठा आमची नाही पण देवाची आहे.
एक्सप्लोर करा 2 करिं. 4:7
5
2 करिं. 4:4
जो ख्रिस्त देवाचे प्रतिरूप आहे त्याच्या गौरवाच्या सुवार्तेचा प्रकाश त्यांना प्रकाशमान होऊ नये म्हणून, असे जे विश्वास ठेवत नाहीत, त्यांची मने या युगाच्या दुष्ट दैवताने आंधळी केलीली आहेत.
एक्सप्लोर करा 2 करिं. 4:4
6
2 करिं. 4:6
कारण ज्या देवाने प्रकाशाला अंधारामधून प्रकाशण्यास सांगितले तो आमच्या अंतःकरणात, येशू ख्रिस्ताच्या मुखावरील, देवाच्या गौरवाच्या ज्ञानाचा प्रकाश पाडण्यासाठी प्रकाशला आहे.
एक्सप्लोर करा 2 करिं. 4:6
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ