1
रोमकरांस पत्र 5:8
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
परंतु देव आपल्यावरच्या स्वतःच्या प्रीतीचे प्रमाण हे देतो की, आपण पापी असतानाच ख्रिस्त आपल्यासाठी मरण पावला.
तुलना करा
एक्सप्लोर करा रोमकरांस पत्र 5:8
2
रोमकरांस पत्र 5:5
आणि ‘आशा लाजवत नाही;’ कारण आपल्याला दिलेल्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आपल्या अंतःकरणात देवाच्या प्रीतीचा वर्षाव झाला आहे.
एक्सप्लोर करा रोमकरांस पत्र 5:5
3
रोमकरांस पत्र 5:3-4
इतकेच नाही, तर संकटांचाही अभिमान बाळगतो, कारण आपल्याला ठाऊक आहे की, संकटाने धीर, धीराने शील व शीलाने आशा निर्माण होते
एक्सप्लोर करा रोमकरांस पत्र 5:3-4
4
रोमकरांस पत्र 5:1-2
ह्यास्तव आपण विश्वासाने नीतिमान ठरवलेले आहोत म्हणून आपल्याला आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे देवाबरोबर शांती आहे. आपण ज्या कृपेमध्ये आहोत, तिच्यात आपला प्रवेशही त्याच्या द्वारे विश्वासाने झाला आहे; आणि आपण देवाच्या गौरवाच्या आशेचा अभिमान बाळगतो.
एक्सप्लोर करा रोमकरांस पत्र 5:1-2
5
रोमकरांस पत्र 5:6
आपण दुर्बळ असतानाच ख्रिस्त सुवेळी अभक्तांसाठी मरण पावला.
एक्सप्लोर करा रोमकरांस पत्र 5:6
6
रोमकरांस पत्र 5:9
तर आता त्याच्या रक्ताने नीतिमान ठरवण्यात आल्यामुळे आपण विशेषेकरून त्याच्या द्वारे देवाच्या क्रोधापासून तारले जाणार आहोत.
एक्सप्लोर करा रोमकरांस पत्र 5:9
7
रोमकरांस पत्र 5:19
कारण जसे त्या एकाच मनुष्याच्या आज्ञाभंगाने पुष्कळ जण पापी ठरले होते, तसे ह्या एकाच मनुष्याच्या आज्ञापालनाने पुष्कळ जण नीतिमान ठरतील.
एक्सप्लोर करा रोमकरांस पत्र 5:19
8
रोमकरांस पत्र 5:11
इतकेच केवळ नाही, तर ज्याच्या द्वारे समेट ही देणगी आपल्याला आता मिळाली आहे त्या आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपण देवाच्या ठायी अभिमान बाळगतो.
एक्सप्लोर करा रोमकरांस पत्र 5:11
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ