1
रोमकरांस पत्र 12:2
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
देवाची उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे, म्हणून ह्या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वत:चे रूपांतर होऊ द्या.
तुलना करा
एक्सप्लोर करा रोमकरांस पत्र 12:2
2
रोमकरांस पत्र 12:1
म्हणून बंधुजनहो, मी देवाच्या करुणांमुळे तुम्हांला विनवतो की, तुम्ही आपली शरीरे जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करावीत; ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे.
एक्सप्लोर करा रोमकरांस पत्र 12:1
3
रोमकरांस पत्र 12:12
आशेने हर्षित व्हा; संकटात धीर धरा; प्रार्थनेत तत्पर राहा
एक्सप्लोर करा रोमकरांस पत्र 12:12
4
रोमकरांस पत्र 12:21
वाइटाने जिंकला जाऊ नकोस, तर बर्याने वाइटाला जिंक.
एक्सप्लोर करा रोमकरांस पत्र 12:21
5
रोमकरांस पत्र 12:10
बंधुप्रेमाच्या बाबतीत एकमेकांना खरा स्नेहभाव दाखवा; तुम्ही प्रत्येक जण दुसर्याला आदराने आपल्यापेक्षा थोर माना.
एक्सप्लोर करा रोमकरांस पत्र 12:10
6
रोमकरांस पत्र 12:9
प्रीतीमध्ये ढोंग नसावे; वाइटाचा वीट माना; बर्याला चिकटून राहा
एक्सप्लोर करा रोमकरांस पत्र 12:9
7
रोमकरांस पत्र 12:18
शक्य तर सर्व माणसांबरोबर तुमच्याकडून होईल तितके शांतीने राहा.
एक्सप्लोर करा रोमकरांस पत्र 12:18
8
रोमकरांस पत्र 12:19
प्रिय जनहो, सूड उगवू नका, तर देवाच्या क्रोधाला वाट द्या; कारण असा शास्त्रलेख आहे की, “सूड घेणे माझ्याकडे आहे, मी फेड करीन,” असे प्रभू म्हणतो.
एक्सप्लोर करा रोमकरांस पत्र 12:19
9
रोमकरांस पत्र 12:11
आस्थेविषयी मंद असू नका; आत्म्यात उत्सुक असा; प्रभूची सेवा करा
एक्सप्लोर करा रोमकरांस पत्र 12:11
10
रोमकरांस पत्र 12:3
कारण मला प्राप्त झालेल्या कृपादानांवरून मी तुमच्यापैकी प्रत्येक जणाला असे सांगतो की, आपल्या योग्यतेपेक्षा स्वतःला अधिक मानू नका, तर देवाने प्रत्येकाला वाटून दिलेल्या विश्वासाच्या परिमाणानुसार मर्यादेने स्वतःला माना.
एक्सप्लोर करा रोमकरांस पत्र 12:3
11
रोमकरांस पत्र 12:17
वाइटाबद्दल वाईट अशी कोणाची फेड करू नका. सर्व माणसांच्या दृष्टीने जे सात्त्विक ते करण्याकडे लक्ष ठेवा.
एक्सप्लोर करा रोमकरांस पत्र 12:17
12
रोमकरांस पत्र 12:16
परस्पर एकचित्त असा. मोठमोठ्या गोष्टींवर चित्त ठेवू नका, तर लीन वृत्तीच्या लोकांचा सहवास ठेवा. स्वत:ला शहाणे समजू नका.
एक्सप्लोर करा रोमकरांस पत्र 12:16
13
रोमकरांस पत्र 12:20
उलटपक्षी, “तुझा शत्रू भुकेला असल्यास त्याला खायला दे; तान्हेला असल्यास त्याला प्यायला दे; कारण असे केल्याने तू त्याच्या मस्तकावर निखार्यांची रास करशील.”
एक्सप्लोर करा रोमकरांस पत्र 12:20
14
रोमकरांस पत्र 12:14-15
तुमचा छळ करणार्यांना आशीर्वाद द्या; आशीर्वादच द्या, शाप देऊ नका. आनंद करणार्यांबरोबर आनंद करा आणि शोक करणार्यांबरोबर शोक करा.
एक्सप्लोर करा रोमकरांस पत्र 12:14-15
15
रोमकरांस पत्र 12:13
पवित्र जनांच्या गरजा भागवा; आतिथ्य करण्यात तत्पर असा.
एक्सप्लोर करा रोमकरांस पत्र 12:13
16
रोमकरांस पत्र 12:4-5
कारण जसे आपल्याला एक शरीर असून त्यात पुष्कळ अवयव आहेत, तरी त्या सर्व अवयवांचे कार्य एकच नाही, तसे आपण पुष्कळ जण असून ख्रिस्तामध्ये एक शरीर आणि प्रत्येक जण एकमेकांचे अवयव असे आहोत.
एक्सप्लोर करा रोमकरांस पत्र 12:4-5
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ