1
शास्ते 16:20
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
ती त्याला म्हणाली, “शमशोन, पलिष्टी तुमच्यावर चालून आले आहेत.” तो झोपेतून जागा झाला. पूर्वीप्रमाणेच आपण उठू व हातपाय झटकू असे त्याला वाटले, पण परमेश्वराने आपल्याला सोडले आहे, ह्याची त्याला कल्पना नव्हती.
तुलना करा
एक्सप्लोर करा शास्ते 16:20
2
शास्ते 16:28
तेव्हा शमशोनाने परमेश्वराचा धावा केला : “हे प्रभू परमेश्वरा, कृपया माझी आठवण कर. हे देवा, फक्त ह्या वेळेस मला बळ दे, म्हणजे आपल्या डोळ्यांबद्दल मी पलिष्ट्यांचा एका झटक्यात बदला घेईन.”
एक्सप्लोर करा शास्ते 16:28
3
शास्ते 16:17
म्हणून त्याने आपले मनोगत तिला सांगितले. तो तिला म्हणाला, “माझ्या डोक्याला कधी वस्तरा लागलेला नाही, कारण मी जन्मापासून देवासाठी नाजीर आहे; माझे मुंडण केल्यास माझी शक्ती जाईल व मी कमजोर होऊन इतर माणसांसारखा होईन.”
एक्सप्लोर करा शास्ते 16:17
4
शास्ते 16:16
तिच्या ह्या रोजच्या कटकटीमुळे व हट्टामुळे त्याला जीव नकोसा झाला
एक्सप्लोर करा शास्ते 16:16
5
शास्ते 16:30
“पलिष्ट्यांबरोबर मलाही मरण येवो,” असे म्हणत आपले सर्व बळ एकवटून त्याने ते खांब रेटले. तेव्हा ती इमारत त्या सरदारांवर व तेथे जमलेल्या सर्व लोकांवर कोसळली. अशा प्रकारे त्याने मरतेसमयी ठार मारलेले लोक त्याच्या सार्या हयातीत त्याने ठार मारलेल्या लोकांपेक्षा अधिक होते.
एक्सप्लोर करा शास्ते 16:30
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ