1
यशया 40:29
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
तो भागलेल्यांना जोर देतो, निर्बलांना विपुल बल देतो.
तुलना करा
एक्सप्लोर करा यशया 40:29
2
यशया 40:30-31
तरुण थकतात, भागतात; भरज्वानीतले ठेचा खातात; तरी परमेश्वराची आशा धरून राहणारे नवीन शक्ती संपादन करतील; ते गरुडाप्रमाणे पंखांनी वर उडतील; ते धावतील तरी दमणार नाहीत, चालतील तरी थकणार नाहीत.
एक्सप्लोर करा यशया 40:30-31
3
यशया 40:28
तुला कळले नाही काय? तू ऐकले नाहीस काय? परमेश्वर हा सनातन देव, परमेश्वर, दिगंतापर्यंतच्या पृथ्वीचा उत्पन्नकर्ता, थकतभागत नाही; त्याची बुद्धी अगम्य आहे.
एक्सप्लोर करा यशया 40:28
4
यशया 40:3
घोषणा करणार्याची वाणी ऐकू येते की, “अरण्यात परमेश्वराचा मार्ग सिद्ध करा, आमच्या देवासाठी रानात सरळ राजमार्ग करा.
एक्सप्लोर करा यशया 40:3
5
यशया 40:8
गवत सुकते, फूल कोमेजते, पण आमच्या देवाचे वचन सर्वकाळ कायम राहते.
एक्सप्लोर करा यशया 40:8
6
यशया 40:5
म्हणजे परमेश्वराचे गौरव प्रकट होईल आणि सर्व मानवजाती एकत्र मिळून ते पाहील, कारण हे बोलणे परमेश्वराच्या तोंडचे आहे.”
एक्सप्लोर करा यशया 40:5
7
यशया 40:4
प्रत्येक खोरे उंच होवो, प्रत्येक डोंगर व टेकडी सखल होवो; उंचसखल असेल ते सपाट होवो व खडकाळीचे मैदान होवो
एक्सप्लोर करा यशया 40:4
8
यशया 40:11
मेंढपाळाप्रमाणे तो आपल्या कळपास चारील, कोकरे आपल्या कवेत घेऊन उराशी धरून वाहील, आणि पोरे पाजणार्यांना सांभाळून नेईल.
एक्सप्लोर करा यशया 40:11
9
यशया 40:26
आपले डोळे वर करून पाहा; ह्यांना कोणी उत्पन्न केले? तो त्यांच्या सैन्याची मोजणी करून त्यांना बाहेर आणतो; तो त्या सर्वांना नावांनी हाक मारतो, तो महासमर्थ व प्रबळ सत्ताधीश आहे; म्हणून त्यांपैकी कोणी उणा पडत नाही.
एक्सप्लोर करा यशया 40:26
10
यशया 40:22
हाच तो पृथ्वीच्या वरील नभोमंडळावर आरूढ झाला आहे; तिच्यावरील रहिवासी टोळांसमान आहेत; तो आकाश मलमलीप्रमाणे पसरतो, राहण्यासाठी तंबू ताणतात तसे ते तो ताणतो.
एक्सप्लोर करा यशया 40:22
11
यशया 40:2
यरुशलेमेच्या मनाला धीर येईल असे बोला, तिला पुकारून सांगा, तुझे युद्ध संपले आहे. तुझ्या पापाबद्दलचा दंड मिळाला आहे; परमेश्वराच्या हातून तुझ्या सर्व पापांचा तुला दुप्पट बदला मिळाला आहे.
एक्सप्लोर करा यशया 40:2
12
यशया 40:6-7
“घोषणा कर!” अशी वाणी ऐकू आली. तेव्हा कोणीएक म्हणाला, “काय घोषणा करू?” सर्व मानवजाती गवत आहे, तिची सर्व शोभा वनातल्या फुलासारखी आहे. गवत सुकते, फूल कोमेजते, कारण परमेश्वराचा फुंकर त्यावर पडतो; लोक खरोखर गवतच आहेत.
एक्सप्लोर करा यशया 40:6-7
13
यशया 40:10
पाहा, प्रभू परमेश्वर पराक्रम्यासारखा येत आहे; त्याचा भुज त्याचे प्रभुत्व चालवील; पाहा, वेतन त्याच्याजवळ आहे, व प्रतिफळ त्याच्या हाती आहे.
एक्सप्लोर करा यशया 40:10
14
यशया 40:1
सांत्वन करा, माझ्या लोकांचे सांत्वन करा, असे तुमचा देव म्हणतो.
एक्सप्लोर करा यशया 40:1
15
यशया 40:12-14
जलांचे माप आपल्या चुळक्याने कोणी केले आहे? आकाशाचे माप आपल्या वितीने कोणी घेतले आहे? पृथ्वीची धूळ मापाने कोणी मापली आहे? डोंगर काट्याने व टेकड्या तराजूने कोणी तोलल्या आहेत? परमेश्वराच्या आत्म्याचे नियमन कोणी केले आहे? त्याचा मंत्री होऊन त्याला कोणी शिकवले आहे? त्याने कोणाला मसलत विचारली? सन्मार्गाविषयी समज देऊन त्याला कोणी शिक्षण दिले? त्याला कोणी ज्ञान शिकवले? सुज्ञतेचा मार्ग त्याला कोणी दाखवला?
एक्सप्लोर करा यशया 40:12-14
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ