उवा उत्पन्न करण्यासाठी जादुगारांनी आपल्या मंत्रतंत्रांच्या योगे तसे करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना ते साधेना; मनुष्य व पशू उवांनी भरून गेले.
तेव्हा जादुगार फारोला म्हणाले, “ह्यात देवाचा हात आहे.” तरी फारोचे मन कठीण राहिले आणि परमेश्वराने म्हटले होते त्याप्रमाणे तो त्यांचे ऐकेना.