1
निर्गम 7:1
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
मग परमेश्वराने मोशेला म्हटले, “पाहा, तुला मी फारोचा देव करतो, आणि तुझा भाऊ अहरोन हा तुझा संदेष्टा होईल.
तुलना करा
एक्सप्लोर करा निर्गम 7:1
2
निर्गम 7:3-4
मी फारोचे मन कठोर करीन आणि मिसर देशात माझी चिन्हे व अद्भुते विपुल दाखवीन. तरी फारो तुमचे काही ऐकणार नाही. मग मी मिसरावर आपला हात टाकीन आणि त्यांना मोठ्या शिक्षा करून मी माझ्या सेना, माझे लोक, इस्राएलवंशज ह्यांना मिसर देशातून बाहेर काढीन.
एक्सप्लोर करा निर्गम 7:3-4
3
निर्गम 7:5
आणि मिसरावर मी आपला हात उभारून त्यांच्यामधून इस्राएल लोकांना बाहेर काढीन तेव्हा मिसर्यांना कळेल की, मी परमेश्वर आहे.”
एक्सप्लोर करा निर्गम 7:5
4
निर्गम 7:11-12
मग फारोनेही जाणते व मांत्रिक बोलावले; मिसराच्या त्या जादुगारांनीसुद्धा आपल्या मंत्रतंत्रांच्या योगे तसाच प्रकार केला. त्यांनीही आपापल्या काठ्या खाली टाकताच त्यांचे साप झाले; पण अहरोनाच्या काठीने त्यांच्या काठ्या गिळून टाकल्या.
एक्सप्लोर करा निर्गम 7:11-12
5
निर्गम 7:17
परमेश्वर म्हणतो की, ‘मी परमेश्वर आहे हे तुला ह्यावरून कळेल : पाहा, मी आपल्या हातातली काठी नदीतल्या पाण्यावर मारीन तेव्हा त्या पाण्याचे रक्त होईल.
एक्सप्लोर करा निर्गम 7:17
6
निर्गम 7:9-10
“‘तुम्ही स्वत: काही अद्भुत कृती दाखवा’ असे फारो तुम्हांला म्हणेल तेव्हा तू अहरोनाला सांग, ‘आपली काठी घेऊन फारोपुढे टाक म्हणजे तिचा साप होईल.”’ मग मोशे व अहरोन ह्यांनी फारोजवळ जाऊन परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे केले; अहरोनाने आपली काठी फारो व त्याचे सेवक ह्यांच्यापुढे टाकली तेव्हा तिचा साप झाला.
एक्सप्लोर करा निर्गम 7:9-10
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ