मग मारा नावाच्या एका ठिकाणी ते आले; तेथील पाणी फार कडू असल्यामुळे त्यांना ते पिववेना, म्हणून त्या जागेचे नाव मारा1 असे पडले.
तेव्हा “आम्ही काय प्यावे?” असे म्हणून त्यांनी मोशेजवळ कुरकुर केली.
त्याने परमेश्वराचा धावा केला, तेव्हा त्याने त्याला एक झाड दाखवले, ते त्याने पाण्यात टाकल्यावर पाणी गोड झाले. तेथे परमेश्वराने2 त्यांच्यासाठी विधी व नियम लावून दिला; त्यांना कसोटीस लावले आणि म्हटले