1
उपदेशक 9:10
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
जे काही काम तुझ्या हाती पडेल ते आपले सगळे सामर्थ्य खर्च करून कर; कारण ज्या अधोलोकाकडे तू जात आहेस तेथे काही उद्योग, युक्तिप्रयुक्ती, बुद्धी व ज्ञान ह्यांचे नाव नाही.
तुलना करा
एक्सप्लोर करा उपदेशक 9:10
2
उपदेशक 9:11
मी परत येऊन भूतलावर आणखी पाहिले तो वेगवानांनाच शर्यतीत यश व वीरांनाच युद्धात विजयश्री मिळते असे नाही; शहाण्यांनाच अन्न व समंजसांनाच धन मिळते आणि ज्ञात्यांवरच अनुग्रह होतो असे नाही; तर सर्व कालवश व दैववश आहेत.
एक्सप्लोर करा उपदेशक 9:11
3
उपदेशक 9:9
देवाने ह्या भूतलावर तुझ्या व्यर्थ आयुष्याचे जे दिवस नेमले आहेत ते तुझे सर्व व्यर्थ दिवस आपल्या प्रिय स्त्रीबरोबर सुखाने घालव. आयुष्यात हा तुझा वाटा आहे; ह्या भूतलावर जे परिश्रम तू करतोस त्यांचे हे फळ तुला आहे.
एक्सप्लोर करा उपदेशक 9:9
4
उपदेशक 9:7
जा, तू आनंदाने आपली भाकर खा; हर्षभराने आपला द्राक्षारस पी; कारण देवाचा तुझ्या कृत्यांवर प्रसाद झाला आहे.
एक्सप्लोर करा उपदेशक 9:7
5
उपदेशक 9:18
युद्धशस्त्रांपेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे; एकटा पापी बहुत हिताची नासाडी करतो.
एक्सप्लोर करा उपदेशक 9:18
6
उपदेशक 9:17
मूर्खांच्या राजाने केलेल्या ओरडीपेक्षा शांतपणे ऐकलेले शहाण्यांचे शब्द बरे.
एक्सप्लोर करा उपदेशक 9:17
7
उपदेशक 9:5
आपल्याला मरायचे आहे हे जिवंतांना निदान कळत असते; पण मेलेल्यांना तर काहीच कळत नाही; त्यांना आणखी काही फलप्राप्ती होणार नसते; त्यांचे स्मरण कोणाला राहत नाही.
एक्सप्लोर करा उपदेशक 9:5
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ