1
उपदेशक 8:15
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
मग मी हास्यविनोदाची प्रशंसा करून म्हणालो, ह्या भूतलावर मनुष्याने खावे, प्यावे व चैन करावी ह्यांपेक्षा इष्ट त्याला काही नाही; देवाने त्याला ह्या भूतलावर जो आयुष्यकाल दिला आहे त्यात श्रम करीत असता एवढेच त्याच्याबरोबर राहणार.
तुलना करा
एक्सप्लोर करा उपदेशक 8:15
2
उपदेशक 8:12
पापी शंभरदा पाप करून पुष्कळ दिवस वाचला तरी माझी खातरी आहे की देवाचे भय बाळगणारे जे त्याला भिऊन वागतात त्यांचे कल्याणच होईल
एक्सप्लोर करा उपदेशक 8:12
3
उपदेशक 8:6
प्रत्येक गोष्टीला नेमलेला काळ व न्यायसमय असतो, कारण मनुष्याची भयंकर दुर्दशा होते.
एक्सप्लोर करा उपदेशक 8:6
4
उपदेशक 8:8
प्राणावर कोणा मनुष्याची अशी सत्ता नसते की तो त्याला जाऊ देणार नाही; मरणदिवस कोणाच्या स्वाधीन नाही; हा संग्राम कोणाला सुटणार नाही. दुष्कर्म आपल्या मालकाचा बचाव करीत नाही.
एक्सप्लोर करा उपदेशक 8:8
5
उपदेशक 8:11
दुष्कर्माबद्दल शिक्षा तत्काळ होत नाही म्हणून मानवपुत्रांचे मन दुष्कर्म करण्याकडे प्रवृत्त होते.
एक्सप्लोर करा उपदेशक 8:11
6
उपदेशक 8:14
पृथ्वीवर आणखी एक व्यर्थ गोष्ट घडते : असे काही नीतिमान लोक असतात की दुष्टांच्या करणीमुळे त्यांची जी स्थिती व्हावी ती ह्यांची होते; आणि असे काही दुर्जन असतात की नीतिमानांच्या करणीमुळे त्यांची जी स्थिती व्हावी ती ह्यांची होते; हेही व्यर्थ! असे मी म्हटले.
एक्सप्लोर करा उपदेशक 8:14
7
उपदेशक 8:7
पुढे काय होणार हे त्याला ठाऊक नसते; कसे काय होणार हे त्याला कोण सांगेल?
एक्सप्लोर करा उपदेशक 8:7
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ