1
उपदेशक 5:2
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
बोलण्याची घाई करू नकोस; देवासमोर कोणताही उद्गार तोंडावाटे काढण्यास आपले मन उतावळे करू नकोस; कारण देव स्वर्गात आहे आणि तू तर पृथ्वीवर आहेस; म्हणून तुझे बोलणे अल्प असावे.
तुलना करा
एक्सप्लोर करा उपदेशक 5:2
2
उपदेशक 5:19
कोणा मनुष्याला देवाने धनसंपत्ती दिली असेल, तिचा उपभोग घेण्याची, आपला वाटा उचलण्याची व परिश्रम करताना आनंद पावण्याची शक्ती दिली असेल, तर ही देवाची देणगीच समजावी.
एक्सप्लोर करा उपदेशक 5:19
3
उपदेशक 5:10
ज्याला पैसा प्रिय वाटतो त्याची पैशाने तृप्ती होत नाही; जो विपुल धनाचा लोभ धरतो त्याला काही लाभ घडत नाही; हेही व्यर्थ!
एक्सप्लोर करा उपदेशक 5:10
4
उपदेशक 5:1
तू देवाच्या मंदिरी जातोस तेव्हा सांभाळून पाऊल टाक; बोध श्रवण करण्यास समीप जाणे हे मूर्खाच्या बलिहवनापेक्षा बरे; आपण अधर्म करतो हे त्यांना कळत नाही.
एक्सप्लोर करा उपदेशक 5:1
5
उपदेशक 5:4
तू देवाला नवस केला असल्यास तो फेडण्यास विलंब करू नकोस, कारण देव मूर्खावर प्रसन्न होत नसतो; जो नवस तू केला असेल त्याची फेड कर.
एक्सप्लोर करा उपदेशक 5:4
6
उपदेशक 5:5
नवस करावा आणि तो फेडू नये ह्यापेक्षा तो मुळीच न करणे बरे.
एक्सप्लोर करा उपदेशक 5:5
7
उपदेशक 5:12
कष्ट करणारा थोडे खावो की फार खावो, त्याची निद्रा गोड असते; पण धनिकाची धनाढ्यता त्याला झोप येऊ देत नाही.
एक्सप्लोर करा उपदेशक 5:12
8
उपदेशक 5:15
तो मातेच्या उदरातून निघाला तसाच नग्न परत जाईल, आपल्या श्रमाचे काहीही फळ आपल्याबरोबर घेऊन जाणार नाही.
एक्सप्लोर करा उपदेशक 5:15
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ