तर आता हे इस्राएला, तू आपला देव परमेश्वर ह्याचे भय धरावे, त्याच्या सर्व मार्गांनी चालावे, त्याच्यावर प्रीती करावी, पूर्ण मनाने व पूर्ण जिवाने तुझा देव परमेश्वर ह्याची सेवा करावी,
आणि परमेश्वराच्या ज्या आज्ञा व विधी मी आज तुझ्या बर्यासाठी सांगत आहे ते तू पाळावेस, तुझा देव परमेश्वर तुझ्यापासून ह्यापेक्षा जास्त काय मागतो?