नृत्य करणार्या स्त्रिया आळीपाळीने येणेप्रमाणे म्हणत : “शौलाने हजारो वधले, दाविदाने लाखो वधले.”
हे ऐकून शौलाला फार क्रोध आला; हे त्यांचे शब्द त्याला आवडले नाहीत; तो म्हणाला, “त्यांनी दाविदाला लाखांचे यश दिले व मला केवळ हजारांचे यश दिले; राज्यावाचून त्याला आणखी काय मिळायचे राहिले?”