1
१ शमुवेल 17:45
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
तेव्हा दावीद त्या पलिष्ट्याला म्हणाला, “तू तलवार, भाला व बरची घेऊन माझ्यावर चालून आलास; पण इस्राएली सैन्यांच्या देवाला तू तुच्छ लेखले आहेस; त्या सेनाधीश परमेश्वराच्या नामाने मी तुझ्याकडे आलो आहे.
तुलना करा
एक्सप्लोर करा १ शमुवेल 17:45
2
१ शमुवेल 17:47
आणि ह्या सगळ्या समुदायाला कळून येईल की परमेश्वर तलवारीने व भाल्याने विजयी होतो असे नाही; कारण हे युद्ध परमेश्वराचे आहे; तो तुम्हांला आमच्या हाती देईल.”
एक्सप्लोर करा १ शमुवेल 17:47
3
१ शमुवेल 17:37
दावीद आणखी म्हणाला, “ज्या परमेश्वराने मला सिंहाच्या व अस्वलाच्या पंजातून सोडवले तोच मला ह्या पलिष्ट्याच्या हातून सोडवील.” तेव्हा शौल दाविदाला म्हणाला, “जा, परमेश्वर तुझ्याबरोबर असो.”
एक्सप्लोर करा १ शमुवेल 17:37
4
१ शमुवेल 17:46
आज परमेश्वर तुला माझ्या हाती देईल; मी तुझा वध करीन, व तुझे शिर धडापासून वेगळे करीन. मी आज पलिष्टी सैनिकांची प्रेते आकाशातील पक्ष्यांना व वनपशूंना देईन; तेव्हा इस्राएलामध्ये देव आहे असे अखिल पृथ्वीला कळून येईल
एक्सप्लोर करा १ शमुवेल 17:46
5
१ शमुवेल 17:40
मग त्याने आपली काठी हाती घेतली; ओहोळातून पाच गुळगुळीत गोटे वेचून आपल्या थैलीत म्हणजे धनगरी बटव्यात ठेवले, आणि आपली गोफण हाती घेऊन तो त्या पलिष्ट्याकडे गेला.
एक्सप्लोर करा १ शमुवेल 17:40
6
१ शमुवेल 17:32
मग दावीद शौलाला म्हणाला, “त्या पलिष्ट्यामुळे कोणाही माणसाचे मन कचरू नये; आपला दास जाऊन त्याच्याशी लढेल.”
एक्सप्लोर करा १ शमुवेल 17:32
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ