मत्तय 3

3
योहान बाप्तिस्मा देणार
(मार्क 1:1-8; लूक 3:1-18; योहान 1:6-8,15-34)
1त्या दिन मा योहान बाप्तिस्मा देणार ईसन यहूदीया प्रांत ना उजाळ जागा मा हवू प्रचार कराले सुरुवात करना. 2आपला पापस पासून मन फिरावा, कारण स्वर्ग ना राज्य जोळे ईजायेल शे. 3हवू तोच शे, जेना बारामा यशया भविष्यवक्ता नि सांगेल होता.
“उजाळ जागा मा एक हाका मारणार ना शब्द आयकू ईऱ्हायना
कि प्रभु ना रस्ता तयार करा,
त्या सळकस्ले सीधा करा जेनावर तो चालीन.”
4योहान ना कपळा उट ना केसस्ना बनायेल होता आणि आपला कमर वर कातळी ना पट्टा बांधेल होता; तेना जेवण नाकतोडा आणि रानमध हय होत. 5तव यरूशलेम शहर व सर्वा यहूदीया प्रांत ना आणि यार्देन नदी ना आस-पास ना सर्वा जागा वरून लोक तेना कळे इग्यात. 6तेस्नी आपला पापस्ले कबूल कर, आणि यार्देन नदी मा तेना हात कण बाप्तिस्मा लीधा.
7पण तेनी गैरा परूशी आणि सदूकी ज्या दोन प्रकार ना यहुदी समाज ना धार्मिक समूह होतात, तेना कळे बाप्तिस्मा लेवाले येतांना देख, तो तेस्ले सांगणा, तुमी विषारी सापस्ना पिल्ला सारखा शेतस, तुमले कोणी जताळी टाक कि तुमना वर येणारा परमेश्वर ना राग पासून पया? 8तुमना कार्य ले सिद्ध करा, जे दाखाळीन कि तुमी तुमना पाप पासून फिरी जायेल शेतस. 9आणि आपला-आपला मन मा हय नका विचार करा कि आमी अब्राहाम ना संतान शे, कारण कि मी तुमले सांगस कि परमेश्वर ह्या दघळस पासून अब्राहाम साठे संतती उत्पन्न करू सकस. 10आते परमेश्वर ना न्याय ना कुराळ झाळ ना मुयास्ले कापाले तयार शे, तो प्रत्येक त्या झाळ ले जो चांगल फय नई लयत तेस्ले काटीसन विस्तोमा फेकी दिन.
11मी तुमले आपला पापस पासून मन फिराव ना पाणी कण बप्तीसमा देस, पण तो मनातून बी शक्तिशाली शे, मी तेना जोळा ना बंद खोलाना बी योग्य नई, तो तुमले पवित्र आत्मा आणि आग कण बाप्तिस्मा दिन. 12तेना सूप, तेनाच हात मा शे, तो आपला खया चांगल्या प्रकारे साप करीन, आणि आपला गहू ले वावर मा एकत्र करीन, पण भूसिले ले त्या आग मा चेटाळी दिन जे मलायाव नई.
योहान व्दारे येशु ना बाप्तिस्मा
(मार्क 1:9-11; लूक 3:21-22; योहान 1:31-34)
13त्या टाईम ले येशु नि गालील जिल्हा ना नासरेथ गाव तून यार्देन नदी मा योहान कळून बाप्तिस्मा लेवाले उना. 14पण योहान बाप्तिस्मा देणारा हय संगीसन तेले रोकु लागणा, आणि तेले विचार, “मले तुना हात कण बाप्तिस्मा लेवानी गरज शे, आणि तू मना कळे काब ईऱ्हायना?” 15येशु नि तेले हवू उत्तर दिधा, आते असच होवू दे, कारण आपले हय रितीवर सर्वा धर्म पूर कराना योग्य शे, तव योहान नि येशु नि गोष्ट मानी लिधी. 16येशु नि योहान बाप्तिस्मा देणारा कडून बाप्तिस्मा लीधा आणि जसाच तो पाणी तून बाहेर निघणा, आणि देखा तेना साठे आकाश उघडी ग्या, आणि तो परमेश्वर नि आत्मा ले कबुतर ना रूप मा उतरतांना व आपला वरे येतांना देख. 17मंग आकाश मधून परमेश्वर ना आवाज उना आणि येशु ले सांगणा, “हवू मना प्रिय पोऱ्या शे, मी तुनाशी गैरा खुश शे.”

Одоогоор Сонгогдсон:

मत्तय 3: AHRNT

Тодруулга

Хуваалцах

Хувилах

None

Тодруулсан зүйлсээ бүх төхөөрөмждөө хадгалмаар байна уу? Бүртгүүлэх эсвэл нэвтэрнэ үү