उत्पत्ती 49:24-25
उत्पत्ती 49:24-25 MARVBSI
तथापि त्याचे धनुष्य मजबूत राहिले; याकोबाचा समर्थ देव, मेंढपाळ, इस्राएलाचा खडक ह्याच्या नावाने त्याचे भुज स्फुरण पावले. तुझे साहाय्य करणारा तुझ्या पित्याचा देव, तुला वरदान देणारा सर्वसमर्थ देव ह्याच्याकडून हे होईल. वरून आकाशाची व खालून जलाशयाची वरदाने तो तुला देईल, अंगावर पिणार्यांची व पोटच्या फळांची वरदाने तो तुला देईल.